शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

नगरपरिषद निवडणूक : अपक्ष उमेदवारी, एबी फॉर्मसाठी शेवटपर्यंत धडपड

By admin | Updated: October 30, 2016 00:08 IST

काँग्रेस आणि भाजपाने अनेक विद्यमान नगरसेवकांना डच्चू देत त्यांना शांत बसण्याचा सल्ला दिला.

यवतमाळ : काँग्रेस आणि भाजपाने अनेक विद्यमान नगरसेवकांना डच्चू देत त्यांना शांत बसण्याचा सल्ला दिला. मात्र अनेकांनी पक्षादेश डावलून अपक्ष म्हणून उमेदवारी दाखल केल्याने या दोन्ही पक्षांसमोर बंडखोरांना शांत करण्याचे आव्हान उभे ठाकले आहे.नगरसेवक पदाचा उमेदवार निवडताना काँग्रेस आणि भाजप या दोन्ही राष्ट्रीय पक्षांनी अनेक विद्यमान नगरसेवकांना घरी बसण्याचा सल्ला दिला. काँग्रेसने पक्षातील काही ज्येष्ठ सदस्यांना डावलून नवख्याना संधी दिली. हाच निकष भाजपनेही लावला. भाजपाने काही प्रभागात पक्षातील दावेदारांना डावलून ऐनवेळी पक्ष प्रवेश करणाऱ्यांना उमेदवारी बहाल केली. दुसरीकडे शुक्रवारी रात्री पासून पक्षाची उमेदवारी मिळविण्यासाठी धडपड करणाऱ्या इच्छुकांचा उमेदवारी न मिळाल्याने भ्रमनिरास झाला. त्यामुळे शेवटच्या क्षणी अनेकांनी अपक्ष उमेदवारी दाखल करण्याचा निर्णय घेतला. काँग्रेस आणि भाजपने परंपरागत चेहऱ्यांना संधी डावलून नवख्यांना संधी दिली. उमेदवारी देताना जुन्या-नव्यांची सरमिसळ करण्यात आली. यामुळे पक्षाची उमेदवारी निश्चित मानणाऱ्यांना ऐनवेळी मोठा धक्का बसला. पक्ष उमेदवारी देणार नाही, हे कळताच काहींनी सोयीच्या पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल केले. त्याचा लाभ काही प्रभागात राष्ट्रवादी काँग्रेसला झाला. भाजपनेसुध्दा काही विद्यमान नगरसेवकांना उमेदवारी नाकारली. इतकेच नव्हे तर पक्षातील दावेदारांना वेटींगवर ठेवून ऐनवेळी आयात केलेल्यांना उमेदवारी बहाल केली. त्यामुळे सध्या काँग्रेस आणि भाजपाच्या गोटात ‘कही खुशी, कही गम‘, अशी स्थिती आहे. अनेक प्रभागात आपल्यासोबत सोयीचा उमेदवार मिळावा म्हणून नेत्यांसमोरच कार्यकर्त्यांत हातापाईचे प्रसंगसुध्दा उद्भवले. मात्र नेत्यांनी दोघांतही समेट घडवून प्रकरण जागीच निस्तारले. (कार्यालय प्रतिनिधी)