जैन मंदिरात मुलनायक स्थापना व शिलान्यास

By Admin | Updated: May 28, 2014 00:00 IST2014-05-28T00:00:54+5:302014-05-28T00:00:54+5:30

दिगंबर जैन मंडळ यवतमाळद्वारा संचालित वाघापूर येथील श्री १00८ भगवान महावीर दिगंबर जैन मंदिर येथे मुलनायक स्थापना, मानस्तंभ वेदी प्रतिष्ठा, समता सागर सभागृहाचे लोकार्पण,

Mulanayak Foundation and Shilanyas in the Jain Temple | जैन मंदिरात मुलनायक स्थापना व शिलान्यास

जैन मंदिरात मुलनायक स्थापना व शिलान्यास

यवतमाळ : दिगंबर जैन मंडळ यवतमाळद्वारा संचालित वाघापूर येथील श्री १00८ भगवान महावीर दिगंबर जैन मंदिर येथे मुलनायक स्थापना, मानस्तंभ वेदी प्रतिष्ठा, समता सागर सभागृहाचे लोकार्पण, ध्यान केंद्राचा शिलान्यास आणि तेरा सो एकया पुस्तकाचे प्रकाशन पार पडले.तेरा सो एकया पुस्तकाचे प्रकाशन आणि मुनिश्री अरहसागरजी महाराज यांच्या जिंदगी की सुरक्षाया भित्तीचित्राचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी संदीपभैया ब्रह्मचारी सोनू भैया, योगेश विठाळकर, सुरेश शहाकार, श्रीकांत इंगोले, आशीष संगई आदींची उपस्थिती होती. या कार्यक्रमांसाठी नयन आगरकर, सुभाष शेंडेकर, नरेश पिसोळे, नेमीनाथ राऊळकर, किशोर अंबरकर आदींनी पुढाकार घेतला. (वार्ताहर)

तीर्थरक्षा शिरोमणी आचार्य श्री १0८ आर्यानंदी महाराज यांच्या प्रेरणेने आणि संत शिरोमणी आचार्य श्री १0८ विद्यासागरजी महाराज यांच्या शुभाशीर्वादाने वात्सल्यमूर्ती मुनिश्री समतासागरजी महाराज, मुनिश्री अरहसागरजी महाराज, येलकश्री निश्‍चयसागरजी महाराज यांच्या पावन सानिध्यात मुलनायक स्थापना, मानस्तंभ वेदी प्रतिष्ठा आणि विश्‍वशांती महायज्ञ झाला.

पहिल्या दिवशी घटयात्रेनंतर दिगंबर जैन मंडळाचे अध्यक्ष अनिल पखाले, वर्षा पखाले यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. मंडप उद्घाटन रवींद्र काळे व पुष्पा काळे यांनी केले. मंडप शुद्धीकरणानंतर इंद्र-इंद्रायणींच्या हस्ते याग मंडळ विधानाचा पुर्वार्ध झाला. मुनिश्री समतासागर महाराज यांचे प्रवचन झाले. दरम्यान, नृत्य आणि नाटिका सादर करण्यात आल्या. दुसर्‍या दिवशी जाप्यानुष्ठान व नित्याभिषेक होवून ८१ मंत्रांनी वेदीशुद्धी, मंदिरशुद्धी करून याग मंडळ विधानाचा उत्तरार्ध पार पडला. दुपारी मुनिश्रींच्या प्रवचनानंतर भगवान महावीर यांच्या जीवन चरित्रावर नाटिका सादर करण्यात आली.

तिसर्‍या दिवशी विश्‍वशांती महायज्ञानंतर भगवान महावीरांच्या प्रतिमेची शोभायात्रा काढण्यात आली. यात इंद्र-इंद्रायणींसह सकल जैन समाज सहभागी झाला होता. जीनबिंब स्थापनेनंतर २१ फूट उंच मानस्तंभावर चारही दिशेला भगवान महावीरांच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली. तीनही दिवस विश्‍वशांती मनोकामना, मुनीसंघद्वारा जिनेंद्र भगवान अभिषेक आणि शांतीधारा करण्यात आली. सदर कार्यक्रम बा.ब्र. पंडित आदेश वैद्य (कारंजा), पंडित शांतीलाल भिमावत (अकोला) यांच्या हस्ते पार पडले. संदीप जैन आणि संचाने (शिवनी, म.प्र.) संगीतमय कार्यक्रम सादर केले.

सभागृहाचे उद्घाटन

दिगंबर जैन मंदिर महावीरनगर वाघापूर येथे समता सागर सभागृहाचे उद्घाटन लोकमत यवतमाळ जिल्हा कार्यालय प्रमुख किशोर दर्डा यांच्या हस्ते झाले. मुनिश्रींच्या सानिध्यात हा सोहळा पार पडला. प्रसंगी किशोर दर्डा यांचा सन्मानचिन्ह व श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला. यावेळी मंडळाचे अध्यक्ष अनिल पखाले, सचिव डॉ. शेखर बंड, अनिल चानेकर, अभय भुसारी, जिनेंद्र बंगाले, नंदकुमार इंगोले, मिलिंद काळे, राजेश चाणेकर, मिलिंद कहाते आदी उपस्थित होते.

ध्यान केंद्राचा शिलान्यास

मंदिर परिसरात ध्यान केंद्राचा शिलान्यास आणि भूमिपूजन मुनिश्रींच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी सुरेश फुलंब्रीकर, विनोद महाजन आदींनी मुख्य शीला ठेवली. लीलाबाई वाकळे, प्रमोद शेंडेकर, अनिल पखाले परिवारातर्फे प्रत्येकी एक शीला ठेवण्यात आली. नियोजित ध्यान केंद्र ११ फूट खोल असून या केंद्राचा नकाशा आनंद जैन यांनी तयार केला आहे.

पुस्तकाचे प्रकाशन

आचार्य श्री विद्यासागरजी महाराज यांच्या प्रवचनाचा संक्षिप्त संग्रह असलेल्या मुनिश्री समतासागरजी महाराज यांनी संपादित केलेल्या

Web Title: Mulanayak Foundation and Shilanyas in the Jain Temple

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.