ढाडकी येथे मुजोर वीज कर्मचाऱ्यांची ग्राहकांशी हुज्जत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:27 IST2021-06-22T04:27:43+5:302021-06-22T04:27:43+5:30

ढाणकी : शहरात सोमवारी थकीत वीज बिल वसुलीसाठी आलेल्या पुसद येथील वीज वितरणच्या एका कर्मचाऱ्याने गोंधळ घालून ग्राहकांशी ...

Mujor power workers fight with customers at Dhadki | ढाडकी येथे मुजोर वीज कर्मचाऱ्यांची ग्राहकांशी हुज्जत

ढाडकी येथे मुजोर वीज कर्मचाऱ्यांची ग्राहकांशी हुज्जत

ढाणकी : शहरात सोमवारी थकीत वीज बिल वसुलीसाठी आलेल्या पुसद येथील वीज वितरणच्या एका कर्मचाऱ्याने गोंधळ घालून ग्राहकांशी हुज्जत घातली.

पुसद येथील वीज वितरण कंपनीची चमू थकीत वीज बिल तपासणीसाठी आली होती. शहरात येताच त्यांनी वीज जोडणी तोडण्याचा आणि ग्राहकांशी हुज्जत घालण्याचा प्रकार सुरू केला. वीज ग्राहक त्यांचे एकूण घेत होते. मात्र, आपण मोठे कर्मचारी असा आविर्भाव आणत त्या मुजोर कर्मचाऱ्याने ग्राहकांना अश्लील भाषेत शिवीगाळ केल्याचा आरोप आहे.

हा प्रकार शिवसेना शहरप्रमुख बंटी जाधव यांना समजताच ते कार्यकर्त्यांसह तेथे पाेहोचले. त्यांच्याशीही त्या कर्मचाऱ्याने मुजोरी केली. त्यामुळे वातावरण काही काळ तापले होते. वीज बिल वसुलीच्या नावाने येथे धुडगूस घालणाऱ्या त्या कर्मचाऱ्याला त्वरित निलंबित करावे, अशी मागणी शिवसेनेने केली आहे.

Web Title: Mujor power workers fight with customers at Dhadki