खासदार संजय देशमुख यांच्या वाहनाला यवतमाळमध्ये टिप्परची धडक; १५ दिवसांतील दुसरा अपघात
By सुरेंद्र राऊत | Updated: February 26, 2026 23:48 IST2026-02-26T23:47:42+5:302026-02-26T23:48:21+5:30
खासगी रुग्णालयात घेतला उपचार

खासदार संजय देशमुख यांच्या वाहनाला यवतमाळमध्ये टिप्परची धडक; १५ दिवसांतील दुसरा अपघात
सुरेंद्र राऊत, यवतमाळ: यवतमाळ-वाशिम लाेकसभा क्षेत्राचे खासदार संजय देशमुख यांच्या वाहनाला (क्र. एमएच-२९ बीव्ही-०३३३) अपघात झाला. दारव्हा-दिग्रस मार्गावर साखरा येथील कार्यक्रमातून गुरूवारी सायंकाळी ७ वाजता खासदार देशमुख हे वाहनाने दिग्रसकडे जात असताना एमएच-४० बीजी-६४०३ क्रमांकाच्या टिप्परने मागून जोरात धडक दिली. कारचा मागील भाग क्षतीग्रस्त झाला. यात खासदारांच्या मानेला झटका पडला तर चालकाच्या हाताला जखम झाली आहे.
'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा
अपघाताची माहिती मिळताच दिग्रस पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. तर खासदार संजय देशमुख हे दिग्रस येथील खासगी रुग्णालयात तपासणीसाठी गेले. त्यांची प्रकृती चांगली असून डॉक्टरांकडून प्राथमिक तपासण्या करण्यात आल्याची माहिती स्वीय्य सहायकाने दिली. देशमुख यांच्या वाहनाला १५ दिवसात हा दुसरा अपघात आहे. यापूर्वी आर्णी येथे भरधाव टिप्परने मागून धडक दिली होती. त्यातही सुदैवाने कोणाला दुखापत झाली नाही. अपघाताची माहिती मिळताच कार्यकर्त्यांची गर्दी जमली होती.
१५ दिवसांतील दुसरा अपघात, खासगी रुग्णालयात घेतला उपचार
संजय देशमुख यांच्या वाहनाला १५ दिवसांत हा दुसरा अपघात आहे. यापूर्वी आर्णी येथे भरधाव टिप्परने मागून धडक दिली होती. त्यातही सुदैवाने कोणाला दुखापत झाली नाही.