कोºया सातबारासाठी सोमवारी आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2017 21:56 IST2017-08-12T21:55:48+5:302017-08-12T21:56:06+5:30
शेतकºयांना सरसकट कर्जमाफी करावी आणि सातबारा कोरा करावा, या मागणीसाठी तालुक्यातील शेतकरी ......

कोºया सातबारासाठी सोमवारी आंदोलन
लोकमत न्यूज नेटवर्क
बाभूळगाव : शेतकºयांना सरसकट कर्जमाफी करावी आणि सातबारा कोरा करावा, या मागणीसाठी तालुक्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणात १४ आॅगस्ट रोजी रास्तारोकोसाठी रस्त्यावर उतरतील, असा इशारा येथे झालेल्या शेतकरी न्यायहक्क आंदोलन समितीच्या सभेत देण्यात आला.
शेतकरी सुकाणू समितीतर्फे १४ आॅगस्ट रोजी राज्यव्यापी रास्तारोको आंदोलन करण्यात येणार आहे. त्याच्या जनजागृतीसाठी शेतकरी न्यायहक्क आंदोलन समितीतर्फे जिल्हाभरात सभा घेण्यात येत आहे. शनिवारी बाभूळगाव येथे झालेल्या सभेत मोठ्या प्रमाणात शेतकºयांनी हजेरी लावली. स्वामिनाथन आयोग लागू करावा, मात्र तत्पूर्वी त्यातील तरतूदी सर्वसामान्य शेतकºयांना आधी समजावून सांगाव्या, अशी मागणीही यावेळी शेतकºयांनी केली.
या सभेला समितीचे निमंत्रक देवानंद पवार, अशोक भुतडा, राजेंद्र हेंडवे, मिलिंद धुर्वे, यशवंत इंगोले, हिंमत पाटमासे यांच्यासह प्रवीण येवले, पांडुरंग लांडगे, नायकवाड महाराज, नारायणराव सराडकर, प्रकाश तातेड, भैयासाहेब देशमुख, अशोकराव घारफळकर, श्रीकांत कापसे, नरेंद्र कोंबे, जयवंतराव घोंगे, महेंद्र घुरडे, दिनेश गुल्हाने, अमोल कापसे, नरेंद्र देशमुख आदी उपस्थित होते.