महाळुंगी ग्रामस्थांचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2019 06:00 IST2019-09-18T06:00:00+5:302019-09-18T06:00:18+5:30

माहाळुंगी गावात मागील अनेक महिन्यांपासून पाणीपुरवठा योजना बंद आहे. पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीमध्ये ब्लिचिंग पावडर टाकण्यात आले नाही. पिण्याजोगे पाणी नागरिकांना मिळत नाही. गावातील नाल्यांची साफसफाई करण्यात येत नाही. गावात बहुतांश भागात सांडपाण्यासाठी नाल्याच नाही. गावात घाणीचे साम्राज्य पसरले आहे.

Movement of Mahalungi villagers | महाळुंगी ग्रामस्थांचे आंदोलन

महाळुंगी ग्रामस्थांचे आंदोलन

ठळक मुद्देआर्णी पंचायत समिती : पिण्याच्या पाण्यासाठी महिलांचा ठिय्या, बीडीओंचे आश्वासन

लोकमत न्यूज नेटवर्क
आर्णी : तालुक्यातील माहाळुंगी येथे अनेक दिवसांपासून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. पंचायत समिती प्रशासनाला वारंवार निवेदन व मागण्या करूनही कोणतीच उपाययोजना झाली नाही. भर पावसाळ्यात पिण्याकरिता शुद्ध पाणी नसल्याने येथील ग्रामस्थांना पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. अखेर संतापलेल्या ग्रामस्थांनी मंगळवारी पंचायत समिती कार्यालयावर धडक दिली.
माहाळुंगी गावात मागील अनेक महिन्यांपासून पाणीपुरवठा योजना बंद आहे. पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीमध्ये ब्लिचिंग पावडर टाकण्यात आले नाही. पिण्याजोगे पाणी नागरिकांना मिळत नाही. गावातील नाल्यांची साफसफाई करण्यात येत नाही. गावात बहुतांश भागात सांडपाण्यासाठी नाल्याच नाही. गावात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे आरोग्यवर परिणाम होत आहे. अनेक घरांमध्ये तापाचे रुग्ण आढळत आहे. या समस्या दूर करण्यात याच्या यासाठी पंचायत समिती प्रशासनाला वारंवार निवेदने दिली. मात्र याची कुणीच दखल घेतली नाही. ग्रामपंचायत प्रशासन गावात कुठेच दिसत नाही. ग्रामसेवक गावाकडे कधी फिरकत नाही. अशा स्थितीमुळे गावातील समस्या दिवसेंदिवस वाढत आहे.
यावर तोडगा काढण्यासाठी मंगळवारी महिला व पुरुषांनी डफडे वाजवत आर्णी पंचायत समितीवर धडक दिली. महिलांनी हातात रिकामे हांडे घेवून पंचायत समिती कार्यालयात ठिय्या दिला. यानंतर गटविकास अधिकारी आनंद लोकरे यांनी महिलांना माहाळुंगी येथे येवून परिस्थितीची पाहणी करील व तातडीने उपाययोजना केल्या जाईल, असे आश्वासन दिले.
आंदोलनात आशाबाई जाधव, मुक्ता जाधव, संगीता राठोड, कमला, शिला चव्हाण, ललिता राठोड, पंची आडे, पिपंळी पवार, उत्तम राठोड, धनराज राठोड, विजय राठोड, भुषण चव्हाण, दिलीप राठोड, दत्ता राठोड, अरविंद चव्हाण, देवा आडे, लखन पवार यांच्यासह माहाळुंगी गावातील महिला व पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. समस्या न सुटल्यास ग्रामस्थांनी याहीपेक्षा उग्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

Web Title: Movement of Mahalungi villagers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.