यवतमाळ जिल्ह्यात झाड पडून मोटरसायकलस्वार ठार, एक गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2019 11:20 IST2019-07-26T11:19:26+5:302019-07-26T11:20:10+5:30

यवतमाळ रोडवर बानायत येथे मोटरसायकलवर झाड पडून एक जण ठार तर एकजण गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी १० च्या सुमारास घडली.

A motorcyclist was killed after a tree fell in Yavatmal district | यवतमाळ जिल्ह्यात झाड पडून मोटरसायकलस्वार ठार, एक गंभीर

यवतमाळ जिल्ह्यात झाड पडून मोटरसायकलस्वार ठार, एक गंभीर

ठळक मुद्देचक्काजाम आंदोलन

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ:

पिंपळखुटा येथील दोघेजण यवतमाळकडे जात असताना बानायतजवळ त्यांच्या गाडीवर झाड कोसळून एक जण ठार झाला तर दुसरा गंभीर जखमी झाला. गंभीर जखमीला उपचारासाठी यवतमाळला नेण्यात आले आहे. अद्याप या दोघांची नावे व पत्ते मिळालेले नाहीत.
बांधकाम विभागाने जुने झाड कापले नाही म्हणून हा अपघात झाला असे नागरिकांचे म्हणणे असून, या अपघाताच्या निषेधार्थ दारव्हा-यवतमाळ रोडवरील तिवसा येथे चक्काजाम आंदोलन करण्यात आले आहे.

Web Title: A motorcyclist was killed after a tree fell in Yavatmal district

टॅग्स :Accidentअपघात