दहावीतील मुलगी निघून गेल्याने आईची गळफास घेऊन आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2022 12:23 IST2022-03-17T12:23:13+5:302022-03-17T12:23:24+5:30

आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी मुलगी घरून निघून गेल्याची तक्रार नेर पोलिसात केली होती.

mother commits suicide by hanging after daughter went missing | दहावीतील मुलगी निघून गेल्याने आईची गळफास घेऊन आत्महत्या

दहावीतील मुलगी निघून गेल्याने आईची गळफास घेऊन आत्महत्या

नेर (यवतमाळ) : अल्पवयीन मुलगी घरून निघून गेल्याने आईने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी रात्री ८ च्या सुमारास येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगरात घडली.

मृत ४० वर्षीय महिला एका खासगी रुग्णालयात परिचारिका म्हणून काम करत होती. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी मुलगी घरून निघून गेल्याची तक्रार नेर पोलिसात केली होती.

मंगळवारी मुलगी दहावीचा पेपर सोडविण्यासाठी गेली होती. पेपर सुटल्यानंतरही ती घरी पोहोचली नाही. त्यामुळे ही महिला चिंतित होती. बराच वेळ वाट पाहिल्यानंतरही मुलगी घरी आली नाही. त्यामुळे पोलिसांत तक्रार देऊन त्या घरी आल्या. पती बाहेर गेले होते. घरी कुणी नसल्याची संधी साधून त्यांनी साडीने गळफास लावून आत्महत्या केली. दरम्यान, या प्रकरणी महिलेच्या तक्रारीवरून बाभूळगाव येथील १७ वर्षीय मुलावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: mother commits suicide by hanging after daughter went missing