शहरं
Join us  
Trending Stories
1
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
2
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
3
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
4
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
5
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
6
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
7
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
8
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
9
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
10
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
11
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
12
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
13
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
14
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
15
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
16
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
17
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
18
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
19
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
20
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय

अंत्यसंस्काराहून परतताना काळाचा घाला; अपघातात माय-लेक ठार

By विलास गावंडे | Updated: September 12, 2022 18:41 IST

उपचारादरम्यान दोघांचीही प्राणज्योत मालवली

डोंगरखर्डा (यवतमाळ) : अंत्यसंस्काराहून दुचाकीने गावी परतत असताना झालेल्या अपघातात मायलेकं ठार झाल्याची घटना पांढरकवडा मार्गावरील उमरी रोड येथे रविवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास घडली. सुरेखा महादेव बताले (४०) व शुभम महादेव बताले (२०) रा.डोंगरखर्डा ता. कळंब अशी मृतांची नावे आहे.

महादेव बताले यांच्या काकू ताईबाई नानाजी बताले (रा. किन्हाळा ता. पांढरकवडा) यांचे निधन झाले. त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी हे तिघेही गेले होते. रात्री महादेव बताले हे दुसऱ्या एका दुचाकीने समोर निघाले. तर सुरेखा व शुभम हे दोघे एम.एच.२९/ए.एफ.५३९५ या क्रमांकाच्या दुचाकीने येत होते. दरम्यान, उमरी रोड जवळ एम.एच.२९/बी.यू.७८६३ या क्रमांकाच्या पीकअप वाहनाची धडक दुचाकीला बसली.

गंभीर जखमी झालेल्या सुरेखा व शुभमला नागरिकांनी उमरी रोड येथील रुग्णालयात हलविले. डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार सुरू केले. उपचार घेत असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. या दोघांनाही पोहोचण्यास उशीर होत असल्याने समोर निघालेले महादेव बताले हे काही अंतरावर थांबले. तेथून त्यांनी शुभमच्या मोबाईलवर कॉल केला. हा कॉल मदत करणाऱ्यांपैकी एकाने घेतला. त्यावेळी त्यांना घटनेची माहिती देण्यात आली. तेथूनच ते रुग्णालयात पोहोचले.डोंगरखर्डाची बाजारपेठ बंद

एकाच कुटुंबातील दोन सदस्यांच्या अपघाती मृत्युमुळे सोमवारी डोंगरखर्डा येथील बाजारपेठ बंद ठेवण्यात आली होती. शोकाकुल वातावरणात शुभम व सुरेखा यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. सुरेखा यांच्या मागे पती, मुलगी व आप्त परिवार आहे.

टॅग्स :AccidentअपघातYavatmalयवतमाळ