यवतमाळ जिल्ह्यातील धामणी येथे पाच वर्षांच्या बालिकेवर अतिप्रसंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2020 20:08 IST2020-10-26T20:08:21+5:302020-10-26T20:08:42+5:30
Yawatmal News Molestation यवतमाळ तालुक्यातील धामणी येथील पाच वर्षीय बालिकेवर ती घरी एकटी असल्याचे पाहुन चाळीस वर्षीय इसमाने अतिप्रसंग केल्याची माणुसकिला काळीमा फासणारी घटना धामणी येथे सोमवारी सायंकाळी चार वाजताच्या सुमारास घडली.

यवतमाळ जिल्ह्यातील धामणी येथे पाच वर्षांच्या बालिकेवर अतिप्रसंग
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ: तालुक्यातील धामणी येथील पाच वर्षीय बालिकेवर ती घरी एकटी असल्याचे पाहुन चाळीस वर्षीय इसमाने अतिप्रसंग केल्याची माणुसकिला काळीमा फासणारी घटना धामणी येथे सोमवारी सायंकाळी चार वाजताच्या सुमारास घडली.
मोल मजुरी करुन उदरनिर्वाह करणारे पिडीत बालिकेचे आईवडील कापूस वेचणीच्या कामाला शेतात गेले होते, तर पिडीत मुलगी आपल्या सात वर्षीय मोठ्या बहिणी सोबत घरी होती. दरम्यान, मोठी बहिण बाहेर खेळायला गेली होती तर पिडीत बालिका टिव्ही बघत घरी होती. याचवेळी आरोपी बंडू पांडूरंग भडके (वय ४० वर्ष) याने पिडीत बालिका घरात एकटी असल्याचे दिसताच बालिकेवर बळजबरीने अतिप्रसंग केला आणि पळून गेला. संध्याकाळी आईवडील शेतातून कामावरुन परत आल्यावर पिडीतेने आपबिती कथन केली. आईवडीलांनी मारेगाव पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. पोलिसानी आरोपीला अटक केली असून कार्यवाही सुरु आहे.