मनसेतर्फे स्वस्त दरात पेट्रोल वितरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2018 22:08 IST2018-06-16T22:08:00+5:302018-06-16T22:08:00+5:30
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मनसेतर्फे वणी उपविभागात पाच रूपये स्वस्त दराने पेट्रोल देण्यात आले. यावेळी मनसेने पेट्रोल महागाईचा निषेध केला.

मनसेतर्फे स्वस्त दरात पेट्रोल वितरण
लोकमत न्यूज नेटवर्क
वणी : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मनसेतर्फे वणी उपविभागात पाच रूपये स्वस्त दराने पेट्रोल देण्यात आले. यावेळी मनसेने पेट्रोल महागाईचा निषेध केला.
मनसेचे राज्य उपाध्यक्ष राजू उंबरकर यांच्या नेतृत्वात विधानसभा क्षेत्रातील सहा पेट्रोलपंपावर हा उपक्रम राबविण्यात आला. गेल्या एक महिन्यापासून सतत पेट्रोल दरात होत असलेल्या वाढीला कंटाळलेल्या जनतेला कमी दराने पेट्रोल मिळावे, या उद्देशाने हा उपक्रम राबविला. सकाळी ८ वाजतापासून सायंकाळी ६ वाजेपर्यंत हा उपक्रम सुरू होता. या उपक्रमाचा हजारो नागरिकांनी लाभ घेतला. या उपक्रमाच्या उदघाटनप्रसंगी राजू उंबरकर, संतोष रोगे, श्रीकांत थेरे, बंडू येसेकर उपस्थित होते. यशस्वीतेसाठी धनंजय त्रिंबके, इर्शाद खान, अज्जू शेख, लकी सोमकुंवर, आशिष तेलतुंबडे, अमोल मसेवार, अक्षय हेपट, जयश बुच्चे, पंकज मिश्रा, शुभम पिंपळकर, शंकर पिंपळकर, मयूर मेहता, बंटी धानोरकर, मयूर घटोळे, धम्मादीप शंभरकर, नितीन ताजने, निलेश हुडेकर, लोकेश लाडके, प्रसाद माटे, अनिल ढगे आदींनी परिश्रम घेतले.