शहरं
Join us  
Trending Stories
1
महिलांना तालावर नाचायला लावणाऱ्या औषधाबाबत गूढ; भोंदू खरात नेमकं काय प्यायला द्यायचा?
2
पंजाबविरुद्धच्या लढतीदरम्यान ड्रेसिंग रूमध्येच केलं स्मोकिंग, रियान पराग अडचणीत, व्हिडीओ व्हायरल
3
ओपेक'मध्ये फूट! सौदीशी पंगा आणि इराणचा धोका; संयुक्त अरब अमिरातीने का सोडली जगाची 'तेल संघटना'?
4
PSL 2026: बाबर आझमचे वादळी शतक! तब्बल ७ वर्षांनी केला पुन्हा 'तो' पराक्रम; संघही फायनलमध्ये
5
उष्णतेचा दुहेरी तडाखा! दिवस आणि रात्रीही लाहीलाही; हवामान विभागाने दिला मोठा इशारा
6
डिजिटल पेमेंट, ट्रान्झॅक्शन, म्युच्युअल फंड.., १ मे पासून काय काय बदलणार? तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम
7
मतदार छाननीत गडचिरोलीची आघाडी; मुंबईसह पुणे, ठाणे, नागपूर पिछाडीवर
8
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
9
राशीभविष्य २९ एप्रिल २०२६: मेष, वृश्चिक राशीवर होणार धनाचा वर्षाव; कुंभ, तूळ राशीसाठी आजचा दिवस संघर्षाचा
10
प्रभागात ९७ टक्के मुस्लिम मतदार, तरीही अपक्ष हिंदू महिलेने मारली बाजी, मिळवला दणदणीत विजय
11
निवडणुकीतील मतदान संपताच नागरिकांना झटका बसणार; पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी महागण्याची शक्यता
12
जर्मनीत अंतराळवीरांना १०० दिवसांचा एकांतवास! त्यांनी काही मोठा गुन्हा केला आहे का?
13
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
14
बापरे, हा काय प्रकार! हाय हिल्स घालून अक्षय कुमारचा 'लालपरी' गाण्यावर डान्स, व्हिडीओ व्हायरल
15
मिरा रोडमध्ये धर्म विचारून केला चाकू हल्ला; आराेपी जैब अन्सारी ‘लोन वुल्फ’ असण्याची शक्यता
16
विमान सेवा बंद पडण्याची भीती, कंपन्यांचे केंद्राला मदतीचे साकडे; खर्च दुप्पटीनं वाढला
17
महायुतीतील वाद उफाळला! गोकुळ दूध संघावर प्रशासक येणार; शिंदे-फडणवीस यांच्यात मतभेद?
18
१ मेपासून मराठी भाषा तपासणी मोहीम राबविणार; रिक्षा-टॅक्सीचालकांवर १५ ऑगस्टपर्यंत कारवाई नाही
19
‘आरटीईनुसार विद्यार्थी प्रवेश बंधनकारक’; सुप्रीम कोर्टाने खासगी शाळांना बजावले
20
भीषण गर्मीत मोठे वीज संकट; मागणी विक्रमी, उत्पादन निम्म्यापेक्षा कमी, नागरिक हैराण
Daily Top 2Weekly Top 5

‘मीना बाजार’ने थकविले लाखो रुपयांचे वीज बिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2020 05:00 IST

मीना बाजारसाठी आझाद मैदानातील जागा एका व्यक्तीला जास्तीत जास्त दहा दिवसांसाठी भाड्याने दिली जाते. पुढे दहा-दहा दिवसांसाठी वेगवेगळ्या नावाने कंत्राट वाढविला जातो. नावे वेगवेगळी दिसत असली तरी प्रत्यक्षात पहिल्यांदा दहा दिवसांसाठी मैदान भाड्याने घेणाऱ्या व्यक्तीलाच हे मैदान मिळते. रेकॉर्डवर मात्र भाडेकरी वेगळाच राहतो.

ठळक मुद्देआझाद मैदान : दहा-दहा दिवसांसाठी वेगवेगळ्या नावाने केला जातो करार

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : नाममात्र रकमेत कंत्राट घेऊन प्रत्यक्षात लाखोंची उलाढाल करीत शासनाचा महसूल बुडविल्याने चर्चेत आलेल्या आझाद मैदानातील ‘मीना बाजार’कडे लाखो रुपयांचे विद्युत बिलही थकीत असल्याची माहिती पुढे आली आहे.मीना बाजारसाठी आझाद मैदानातील जागा एका व्यक्तीला जास्तीत जास्त दहा दिवसांसाठी भाड्याने दिली जाते. पुढे दहा-दहा दिवसांसाठी वेगवेगळ्या नावाने कंत्राट वाढविला जातो. नावे वेगवेगळी दिसत असली तरी प्रत्यक्षात पहिल्यांदा दहा दिवसांसाठी मैदान भाड्याने घेणाऱ्या व्यक्तीलाच हे मैदान मिळते. रेकॉर्डवर मात्र भाडेकरी वेगळाच राहतो. पहिल्या दहा दिवसासाठी ज्याला मैदान मिळाले त्याच्याच नावाने एसडीओंची आॅर्डर असते व पुढे त्याच नावाने विद्युत मीटर जारी केले जाते. वास्तविक पुढे दहा-दहा दिवसांनी बदलणाºया जागा मालकानुसार विद्युत मीटरची मालकीही बदलणे अपेक्षित असते. परंतु विद्युत महावितरण कंपनीची यंत्रणा ही तसदी घेत नाही. पहिल्या व्यक्तीच्या नावाने असलेले मीटर शेवटपर्यंत कायम राहते. वितरण कंपनी पहिल्या व्यक्तीवर विद्युत बिलासाठी दावा करू शकते. मात्र नंतरच्या भाडे करारात भाडेकरू बदललेला असतो. त्यामुळे तो हात वर करतो आणि वीज कंपनीही त्याचे काही बिघडवू शकत नाही. अशाच पद्धतीने गेल्या सात ते आठ वर्षांपासून विद्युत कंपनीचे लाखो रुपयांचे बिल थकीत आहे. मीना बाजारातील जुन्या कंत्राटदारांनी बिल थकविले असतानाही नव्याने तेथे मीटर देण्यास वीज कंपनीची यंत्रणा उत्सुक असते. कारण त्यांचेही त्यात ‘चांगभलं’ होते.महावितरण यंत्रणेचे कंत्राटदाराशी साटेलोटेवीज कंपनीतील यंत्रणेचे मीना बाजार कंत्राटदारांशी साटेलोटे असल्यानेच आज लाखो रुपयांचे विद्युत बिल थकीत आहे. त्याच्या वसुलीसाठी मात्र प्रयत्न होताना दिसत नाही. मुळात ही वसुली करणार कुणाकडून हा प्रश्न आहे. कारण रेकॉर्डवर पहिल्यांदा दहा दिवसासाठी मैदान भाड्याने घेतलेल्या व्यक्तीचेच नाव आहे, पुढे ही नावे बदलली आहे. एका महिन्याचे किमान दोन लाख रुपयांचे विद्युत बिल होत असल्याचे सांगितले जाते. यावरून महावितरण कंपनीच्या थकबाकीचा आकडा किती मोठा असेल याचा अंदाज येतो. या प्रकरणी महावितरण कंपनीच्या तलावफैल तक्रार निवारण केंद्राशी संपर्क केला असता आझाद मैदानच्या मीना बाजारकडे कोणतीच विद्युत बिलाची थकबाकी नसल्याचे ‘लोकमत’ला सांगण्यात आले. यावरून वीज कंपनीतील यंत्रणा व मीना बाजारच्या कंत्राटदाराचे संबंध किती सलोख्याचे आहेत, हे स्पष्ट होते.

टॅग्स :electricityवीज