‘वायपीएस’च्या विद्यार्थ्यांनी दिला प्लास्टिक निर्मूलनाचा संदेश

By Admin | Updated: December 21, 2015 02:35 IST2015-12-21T02:35:05+5:302015-12-21T02:35:05+5:30

ग्रामीण संस्कृतीचे दर्शन घडविणारा वासुदेव सर्वांचे लक्ष वेधत होता. जाणीव जागृतीचे पोवाडे सादर करण्यात आले.

The message of Plastic Eradication delivered by 'Yps' students | ‘वायपीएस’च्या विद्यार्थ्यांनी दिला प्लास्टिक निर्मूलनाचा संदेश

‘वायपीएस’च्या विद्यार्थ्यांनी दिला प्लास्टिक निर्मूलनाचा संदेश


यवतमाळ : ग्रामीण संस्कृतीचे दर्शन घडविणारा वासुदेव सर्वांचे लक्ष वेधत होता. जाणीव जागृतीचे पोवाडे सादर करण्यात आले. पथनाट्याच्या शेवटी विद्यार्थी उपस्थितांकडून कॅरीबॅग न वापरण्याची शपथ घेत होते.
या रॅलीमध्ये नगर परिषदेच्या स्वच्छता अभियानाचा देखावा सहभागी झाला होता. त्यासोबत यवतमाळ पब्लिक स्कूल आणि पालकसंघाचा देखावाही सर्वांचे लक्ष वेधत होता. सगळीकडे पसरलेले प्लास्टिक आणि त्यामध्ये असलेली सृष्टी, कॅरीबॅग खात असलेली जनावरे असे जीवंत चित्रण या देखाव्यात साकारण्यात आले. रॅलीदरम्यान भाजी विक्रेते, फळ विक्रेते आणि दुकानदारांच्या प्रतिक्रिया घेत त्यांना प्लास्टिक कॅरीबॅगला पर्याय म्हणून कागदी पिशव्या वापरण्याची विनंती करण्यात आली. तसेच या विक्रेत्यांना कागदी पिशव्याही चिमुकल्या विद्यार्थ्यांनी दिल्या. महात्मा गांधींच्या वेशभूषेतील चिमुकले सर्वांचे लक्ष वेधत होते.
महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर आयोजित कार्यक्रमाचे प्रास्ताविक पॅरेन्टस् कौन्सिलच्या अध्यक्ष सुरूची खरे यांनी केले. पथनाट्याचे संचलन यश बोरुंदिया यांनी केले. यावेळी यवतमाळ प्री-प्रायमरीच्या प्राचार्य निहारिका प्रभूणे, पॅरेन्टस् कौन्सिलच्या सदस्य मेघा इसराणी, कीर्ती राऊत, प्रा.डॉ. साहेबराव साखरे, मिलिंद गोफणे, अमित सरोदे, स्वाती राऊत, किरण राऊत, प्रीती सोनी, आरती भूत, पूजा जेसवाणी, देवेंद्र जोशी, संदीप खांदवे, शुभदा हातगावकर यांच्यासह यवतमाळ पब्लिक स्कूलचे सहावी, सातवी, आठवी आणि नववीतील विद्यार्थी सहभागी झाले होते.
(शहर वार्ताहर)

Web Title: The message of Plastic Eradication delivered by 'Yps' students