लिकर लॉबीच्या प्रमुखांची फार्म हाऊसवर बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2020 05:00 AM2020-05-26T05:00:00+5:302020-05-26T05:00:54+5:30

एका वाईन सम्राटाचा हा फार्म हाऊस आहे. काँग्रेसचे या व्यवसायातील एक ‘अनुभवी’ नेते शेजारील जिल्ह्यातून या बैठकीला हजर झाले. या बैठकीबाबत प्रचंड गोपनीयता पाळण्यात आली. निलंबित झालेले परवाने पुन्हा मुंबईहून ‘जैसे थे’ करून आणायचे कसे, परवाना निलंबनाची जिल्हा प्रशासनाकडे प्रस्तावित कारवाई कशी थांबवायची आदी मुद्यावर बैठकीत चर्चा झाली.

Meeting of the heads of the liquor lobby at the farm house | लिकर लॉबीच्या प्रमुखांची फार्म हाऊसवर बैठक

लिकर लॉबीच्या प्रमुखांची फार्म हाऊसवर बैठक

Next
ठळक मुद्देकारवाई टाळण्यासाठी धडपड : काँग्रेस नेत्याचा पुढाकार, शिवसेना-प्रशासनाला शह देण्याचा प्रयत्न

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : लॉकडाऊन काळात बीअरबार, वाईन शॉपी, बीअर शॉपीमधून दारू विकली गेली, एक्साईजच्या तपासणीत ही बाब सिद्ध झाली. त्यामुळे काहींवर कारवाई झाली तर काहींवरील कारवाई प्रस्तावित आहे. या कारवाईतून बाहेर पडण्यासाठी नेमके काय करावे? या मुद्यावर लिकर लॉबीतील निवडक प्रमुखांची पांढरकवडा रोडवरील फार्म हाऊसवर गेल्या आठवड्यात बैठक पार पडली.
एका वाईन सम्राटाचा हा फार्म हाऊस आहे. काँग्रेसचे या व्यवसायातील एक ‘अनुभवी’ नेते शेजारील जिल्ह्यातून या बैठकीला हजर झाले. या बैठकीबाबत प्रचंड गोपनीयता पाळण्यात आली. निलंबित झालेले परवाने पुन्हा मुंबईहून ‘जैसे थे’ करून आणायचे कसे, परवाना निलंबनाची जिल्हा प्रशासनाकडे प्रस्तावित कारवाई कशी थांबवायची आदी मुद्यावर बैठकीत चर्चा झाली. राजकीय पक्षाची ‘डिमांड’ असेल तर एक पैसाही देऊ नये असे काँग्रेस नेत्याने ठणकावून सांगितले. जिल्हा प्रशासनाने कारवाई करू नये म्हणून वरच्या स्तरावरून सूत्रे हलविण्याची ग्वाही उपस्थित दारू विक्रेत्यांना देण्यात आली.
या लॉबीने स्थानिक पातळीवर शिवसेनेच्या स्तरावरून मध्यम मार्ग काढण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्यात त्यांंना यश आले नाही.
या बैठकीच्या माध्यमातून काँग्रेसचे हे नेते जिल्ह्याच्या राजकीेय आणि प्रशासकीय कारभारात हस्तक्षेप करून येथील प्रमुख राजकीय नेता आणि अधिकाऱ्यांना शह देण्याचा प्रयत्न करीत असल्याचे मानले जाते. फार्म हाऊसवर झालेली काँग्रेस नेत्याची ही बैठक दारव्हा रोडवरील बीअरबारचे परवाने कायमस्वरूपी निलंबित होण्यापासून वाचवू शकते काय? की पूर्वीच्या १९ दारू विक्रेत्यांप्रमाणे या बारमालकांविरुद्धही नियमानुसार कठोर कारवाई करून या काँग्रेस नेत्याला प्रशासनाकडून शह दिला जातो, याकडे नजरा लागल्या आहेत.
दारू साठ्यात तफावत आढळल्याने एक्साईजने दारव्हा रोडवरील पाच बीअरबार व बीअर शॉपीवर कारवाईचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला. आठवडाभरापासून या अहवालावर धडक कारवाईची प्रतीक्षा आहे. यापूर्वी १९ परवाने असेच धडक निर्णय पघेऊन कायमस्वरूपी रद्द केले गेले. याशिवाय शहरातील तीन वाईन शॉपी व तीन देशी दारू विक्रेते यांचीही तपासणी करण्यात आली.

म्हणे, शासनाला कोट्यवधींचा एक्साईज देतो, मग घाबरता कशाला?
लॉकडाऊनमध्ये राज्यात दारू दुकाने उघडली असताना यवतमाळातच बंद का? असा मुद्दा उपस्थित केला गेला. आपण चोर नाही, एक्साईजच्या माध्यमातून शासनाला महसूल देतो, मग घाबरायचे कशाला असे सांगत या काँग्रेस नेत्याने थेट अमरावतीच्या विभागीय महसूल आयुक्तांना फोन लावला. त्यानंतर काही वेळातच दारू दुकाने उघडण्याबाबत आदेश जारी झाले. यापूर्वीसुद्धा याच नेत्याच्या पुढाकाराने ही दारू दुकाने उघडली गेली होती. मात्र वणीत गर्दी झाल्याने नंतर बंद करण्यात आली.

Web Title: Meeting of the heads of the liquor lobby at the farm house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.