शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohini Khadse : "प्रत्येक गोष्टीला वेळ..."; रेव्ह पार्टीमध्ये पतीला अटक झाल्यावर रोहिणी खडसेंची पहिली प्रतिक्रिया
2
शिंदेसेनेच्या मंत्र्यांना बदनाम करण्याचा कट रचला जातोय का?; रामदास कदमांनी व्यक्त केली शंका
3
कुणाची किती ताकद हे कळू द्या, एकटे लढून दाखवा; भाजपाचा स्वबळाचा नारा, शिंदेसेनेला आव्हान?
4
बाराबंकीच्या अवसानेश्वर महादेव मंदिरात चेंगराचेंगरी; दोघांचा मृत्यू, ४० जण जखमी
5
रेपो रेट कपातीचा फायदा वाहन कर्जांना देत नाहीत; खासगी बँकांविरोधात फाडाची रिझर्व्ह बँकेकडे तक्रार
6
IND vs ENG : 'गंभीर' मुद्दा! गिलला कदाचित कुलदीपला खेळवायचे होते, पण... गावसकरांचा रोख कुणाकडे?
7
"योगीजी, या लोकांना सोडू नका"; कॉन्स्टेबलच्या पत्नीचा सासरच्यांकडून अमानुष छळ, संपवलं जीवन
8
"तू सिंगल आहेस का?" रिंकू राजगुरूला चाहत्याचा प्रश्न, अभिनेत्रीने रिलेशनशिप स्टेटसच सांगितलं, म्हणाली...
9
बिग ब्रेकिंग! TCS कंपनी १२ हजारपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढणार; कुटुंबावर मोठं संकट
10
शत्रूसाठी कोणतेच स्थान सुरक्षित नाही हे ‘ऑपरेशन सिंदूर’ने सिद्ध केले: पंतप्रधान नरेंद्र मोदी
11
ठाकरे बंधू पुन्हा भेटले, मनसे-उद्धवसेना युती चर्चांना उधाण; पक्षप्रवेशाचे इनकमिंग थंडावले
12
आजचे राशीभविष्य २८ जुलै २०२५ : प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल
13
राज ठाकरे 'मातोश्री'वर, पुन्हा मनोमिलनाची चर्चा; दोन्ही भावांची गळाभेट, वीस मिनिटे संवाद
14
वरळीतील  कार्यक्रमात अमित ठाकरे हजर; आदित्य ठाकरेंची पाठ, ज्युनियर ठाकरे एकत्र यायचा योग नाही
15
गोंधळानंतर संसदेत आजपासून पुन्हा चर्चा तापणार; ‘ऑपरेशन सिंदूर’वर सत्ताधारी-विरोधक आमने-सामने
16
महाराष्ट्रातील खासदारांना संसदरत्न; संसदीय कामकाज मंत्री किरीन रिजीजू यांच्या हस्ते पुरस्कार
17
वीजप्रवाह उतरल्याच्या अफवेमुळे पळापळ; हरिद्वारच्या मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी
18
११व्या शतकातील शिवमंदिरावरून उफाळला थायलंड-कंबोडिया संघर्ष; नेमके प्रकरण काय, वाद का वाढला?
19
थायलंड-कंबोडिया अखेर शस्त्रसंधीसाठी तयार; ट्रम्प यांची मध्यस्थी, सीमेवर अद्यापही तणाव कायम
20
अमेरिकेत बोइंग विमानाला आग, १७३ प्रवासी बालंबाल बचावले; लँडिंग गीअर बिघडले, उड्डाण रोखले

‘मेडिकल’चे धुलाई केंद्र पावसाळ्यात कोलमडणार

By admin | Updated: May 27, 2016 02:10 IST

येथील शासकीय रूग्णालयात स्वच्छतेच्या नावाने कितीही गलगस्ती असली तरी, रुग्णांच्या बेडवरील चादरी मात्र स्वच्छ असतात.

कपडे सुकविण्यासाठी फ्लोरिंगच नाही : ३०० बेडशिटस्ची धुलाई केवळ तिघांवरअविनाश साबापुरे यवतमाळ येथील शासकीय रूग्णालयात स्वच्छतेच्या नावाने कितीही गलगस्ती असली तरी, रुग्णांच्या बेडवरील चादरी मात्र स्वच्छ असतात. दररोज हजारो चादरी धुणाऱ्या कामगारांच्या समस्या मात्र प्रशासकीय टेकूविना तुंबल्या आहेत. मेडीकल परिसरातील धुलाई केंद्रात फ्लोरिंग न केल्यास पहिल्याच पावसात धुलाई व्यवस्था कोलमडण्याची शक्यता आहे.वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात दररोज हजारो रूग्णांची गर्दी असते. येथील रुग्णांना स्वच्छ बेड उपलब्ध असतात. रुग्णालयातील कापडांच्या स्वच्छतेसाठी परिसरातच यांत्रिक धुलाई केंद्र आहे. मात्र, हे केंद्र सध्या अडचणींचा सामना करीत आहे. दररोज अडीचशे ते ३०० बेडशीट धुण्यासाठी केवळ ३ कर्मचारी (धोबी) येथे कार्यरत आहेत. रोजच कामाचा ताण असल्याने त्यांना वर्षातून एकदाही सुट घेता येत नाही. पूर्वी या केंद्रात १० कर्मचारी होते. मात्र, दहा वर्षांपूर्वी काही कर्मचारी निवृत्त झाले तेव्हापासून राजेश चौधरी, मनीष खेळकर, महादेव चौधरी हे तीनच कर्मचारी आहेत. तर रेखा चौधरी यांना २९ दिवसाच्या रोजंदारीवर कामाला ठेवण्यात आले आहे. मेडीकलमधील साधारण ३० वॉर्डातील कपडे दर सोमवारी धुण्यासाठी येतात आणि ते शनिवारी द्यावेच लागतात. आॅपरेशन थिएटरचे कपडे रोज सकाळी आणणे आणि दुसऱ्या दिवशी देणे आवश्यक असते. कपडे देण्यास थोडासाही विलंब झाला, तर एखाद्या रुग्णाची शस्त्रक्रिया स्थगित केली जाते. मात्र, इतके महत्त्वाचे काम असूनही या केंद्राला सुविधा पुरविण्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. मागणी करूनही कर्मचारी वाढविले नाही. कर्मचारी कमी असल्याने कार्यरत कर्मचाऱ्यांना जादा कपडे धुवावे लागतात. त्यातून संसर्ग होण्याचा धोका आहे. या धुलाई केंद्रात एखाद्या खोलीएवढे धुलाई यंत्र आहे. २००२-०३ मध्ये हे १७ लाखांचे यत्र खरेदी करण्यात आले. मात्र, आता या यंत्राची क्षमता घटली आहे. वारंवार बिघाड होत आहे. परंतु, त्याच्या मेंटनन्सकडे लक्ष पुरविले जात नाही. दररोज हजारो कपडे, चादरी वाळविण्यासाठी रुग्णालयाच्या मोकळ्या परिसराचाच वापर करण्यात येत आहे. कपडे वाळविण्यासाठी जमिनीवर फ्लोरिंग करून देण्याची गरज असतानाही दुर्लक्ष केले जात आहे. सध्या उन्हाळा असल्याने उघड्यावर कपडे वाळविणे शक्य आहे. मात्र, पाऊस सुरू झाल्यावर केंद्राच्या परिसरातच मोठे डबके साचते.त्यावेळी कपडे कसे वाळवायचे हा प्रश्न निर्माण होणार आहे. त्यासाठी नागपूर मेडीकलप्रमाणे फ्लोरिंग करण्याची नितांत गरज आहे. पण कपडे वाळविण्यासाठी साधी दोरी आणि बांबू पुरविण्याचीही तसदी प्रशासन घेताना दिसत नाही. महाआरोग्य शिबिराचा ताणमेडीकलमध्ये ५ जून रोजी महाआरोग्य शिबिर होणार आहे. त्यासाठी विविध समित्या गठीत करून जय्यत तयारी करण्यात येत आहे. मात्र, शिबिरात मोठ्या प्रमाणात शस्त्रक्रिया होण्याची शक्यता असतानाही धुलाई केंद्रात सुविधा पुरविण्याकडे लक्ष देण्यात आलेले नाही. सध्याच्या नियमित कामाचाच ताण कार्यरत तीन कर्मचाऱ्यांना पेलविणे शक्य नाही. त्यात शिबिरामुळे वाढणारा ताण ते कसा पेलणार, हा प्रश्न आहे.