शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे भरकटलेले लोक, त्यांनी..."; उद्धव ठाकरेंची नरेंद्र मोदी-राज ठाकरेंवर बोचरी टीका
2
Manoj Tiwari : "ते स्वत:च स्वत:वर हल्ला करू शकतात..."; मनोज तिवारींचा कन्हैया कुमार यांना खोचक टोला
3
"लोकसभेच्या ४८ जागांपैकी आम्ही..."; काँग्रेसचा मोठा दावा, विजयी आकडाच सांगितला
4
मालदीवनंतर तैवान! संसदेत लाथाबुक्क्या; खासदार टेबलांवर उड्या मारू लागले
5
JP Nadda : "केजरीवालांचा पर्दाफाश, महिलांच्या अपमानावर गप्प का?"; जेपी नड्डा यांचं जोरदार प्रत्युत्तर
6
नरेंद्र मोदींच्या 'रोड शो' साठी मुंबई महापालिकेचा पैसा वापरला; संजय राऊतांचा आरोप
7
बाळासाहेबांच्या खोलीतील कधीही न ऐकलेला गौप्यस्फोट; देवेंद्र फडणवीस म्हणाले...
8
मुंबई इंडियन्स शेवटची मॅचही हरली! हार्दिक पांड्याने सगळे खापर टीमवर फोडले, म्हणतोय...
9
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजात तेजी, Nestle च्या शेअर्समध्ये तेजी, JSW घसरला
10
६० नातेवाईक मिळून देवदर्शनाला गेलेले, बसला पहाटे भीषण आग, ८ जणांचा मृत्यू, २४ गंभीर
11
चिमुकल्याचा मृतदेह, रहस्यमय चिठ्ठी अन् 'ते' ७ शब्द; तांत्रिकाच्या मदतीनं अघोरी डाव?
12
किर्गिस्तानमध्ये स्थानिकांचा भारतीय, पाकिस्तानी विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार; तीन विद्यार्थ्यांची हत्या
13
Infosys नं वाढवली ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची संपत्ती; पत्नीनंही केली मोठी कमाई, जाणून घ्या
14
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
15
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
16
सोढीने केला संसार त्याग?; 25 दिवसानंतर गुरुचरण सिंगची घरवापसी, दिली पहिली प्रतिक्रिया
17
आजचे राशीभविष्य १८ मे २०२४; जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठी चांगला दिवस
18
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
19
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
20
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी

‘मेडिकल’ची रुग्णसेवा कोलमडण्याच्या मार्गावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2018 10:59 PM

येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रुग्णसेवेलाच घरघर लागली असून वैद्यकीय शिक्षण विभागाच्या आडमुठ्या धोरणाने येथील यंत्रणा कोलमडली आहे. एकाच वेळी तब्बल तीन विभाग प्रमुखांसह दोन सहयोगी प्राध्यापकांची बदली करण्यात आली.

ठळक मुद्देपाच डॉक्टरांच्या बदल्या : नवीन डॉक्टर येण्यास तयार नाही, लोकप्रतिनिधी गप्प

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रुग्णसेवेलाच घरघर लागली असून वैद्यकीय शिक्षण विभागाच्या आडमुठ्या धोरणाने येथील यंत्रणा कोलमडली आहे. एकाच वेळी तब्बल तीन विभाग प्रमुखांसह दोन सहयोगी प्राध्यापकांची बदली करण्यात आली. यामुळे पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या जागाही कमी होण्याची भीती आहे.यवतमाळ मेडिकलला राजकीय महत्त्वाकांक्षेतून आखाड्याचे स्वरूप आले आहे. येथे काही दिवसापासून रुग्णसेवेच्या नावाखाली सूडाचे राजकारण सुरू आहे. विभाग प्रमुखातील अंतर्गत धुसफुसीचा फटका रुग्णांना बसत आहे. रुग्णसेवेचा टेंभा मिरविणारे लोकप्रतिनिधीही यावर गप्प आहे. औषधशास्त्र विभागाचे (मेडिसीन) प्रमुख प्रा.डॉ.बाबा येलके यांची जळगाव येथे बदली झाली. छाती विकार तज्ज्ञ विभाग प्रमुख डॉ.अनिकेत भडके यांना चंद्रपूर येथे, औषधी निर्माण शास्त्र प्रमुख डॉ.सुजाता दुधगावकर यांची गोंदिया येथे, शरीरक्रिया शास्त्र विभाग प्रमुख डॉ.काळे यांची जळगाव येथे बदली झाली आहे. याशिवाय शल्यचिकित्सा विभागातील सहयोगी प्रा.डॉ.हेमंत म्हात्रे यांची जळगाव येथे बदली करण्यात आली.भारतीय आयुर्विज्ञान परिषदेची (एमसीआय) चमू अभ्यासक्रमांना मान्यता देण्यासाठी प्रत्यक्ष पाहणीकरिता येत आहे. या स्थितीत रिक्तपदे भरण्याऐवजी येथील प्राध्यापकांची उचलबांगडी करण्यात आली. अनेक दिवसांपासून मुक्कामी प्राध्यापक असा निकष लावण्यात आला. मात्र यातही दुजाभाव झाला असून पिढीजात यवतमाळात ठिय्या देवून असलेल्या प्राध्यापकांचे दुर्लक्ष केले आहे. केवळ अंतर्गत कलहातून हा प्रकार सुरू असून यात रुग्णांचे सर्वात मोठे नुकसान होणार आहे. शिवाय महत्त्वपूर्ण विभागांमध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या जागा मंजूर झाल्या आहे. या जागा कायम ठेवण्याचे आव्हान आहे. अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून पदव्युत्तर अभ्यासक्रमाला मंजुरी घेण्यात आली होती. उदासीन लोकप्रनिधींमुळे ही मंजुरी रद्द होते की काय अशी स्थिती निर्माण झाली आहे.शासनाच्या उदासीन धोरणामुळे ग्रामीण भागातील आरोग्य सुविधेचा बोजवारा उडाला आहे. वैद्यकीय महाविद्यालयात अनेक महिन्यांपासून जीवनावश्यक औषधांचा तुटवडा आहे. हा प्रश्न प्रलंबित असतानाच आता डॉक्टरांच्या जागा झपाट्याने रिक्त झाल्या आहेत. याची झळ सामान्य नागरिकाला बसत आहे.‘मार्ड’ची वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांकडे धावयवतमाळ मेडिकलमधून एकाच वेळी पाच प्राध्यापकांच्या बदल्या झाल्या. या प्रकरणाची मार्डच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी दखल घेतली असून वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीष महाजन यांची मुंबईत भेट घेवून त्यांना मार्डचे अध्यक्ष महेंद्र डांगे यांनी निवेदन देवून प्राध्यापकांच्या रिक्त जागा भरण्याची मागणी केली.