मायावतींबद्दल अनुद्गार काढणाऱ्यांना अटक करा

By Admin | Updated: July 25, 2016 01:03 IST2016-07-25T01:03:03+5:302016-07-25T01:03:03+5:30

बहुजन समाज पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्ष मायावती यांच्याबद्दल अपशब्द काढणाऱ्या भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष दयाशंकर यांचा जाहीर निषेध करून ...

May arrest those who have found out about Mayawati | मायावतींबद्दल अनुद्गार काढणाऱ्यांना अटक करा

मायावतींबद्दल अनुद्गार काढणाऱ्यांना अटक करा

एसडीओंना निवेदन : पुसद बहुजन समाज पार्टी
पुसद : बहुजन समाज पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्ष मायावती यांच्याबद्दल अपशब्द काढणाऱ्या भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष दयाशंकर यांचा जाहीर निषेध करून दयाशंकर यांना तत्काळ अटक करावी, अशी मागणी पुसद बहुजन समाज पार्टीच्यावतीने उपविभागीय अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे.
गुजरात राज्यातील उना येथे दलित समाजातील चार तरुणांवर हल्ला करण्यात आला. या घटनेचे पडसाद राज्यसभेत उमटले. आजही दलितांवर अत्याचार सुरू आहे. बहुजन समाज पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्षा मायावती यांच्याबद्दलही भाजपाच्या उपाध्यक्षांनी अनुद्गार काढले. या प्रकरणी तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली.
निवेदनावर शरद भगत, उत्तमराव ढोले, देवानंद कांबळे, उमेश रामटेके, केशव कांबळे, माधव मनवर, मधुकर खिल्लारे, गोविंदा पाईकराव, नामदेव मनवर, दिलीप हाटे, रमेश वाघमारे, लक्ष्मण कांबळे, रशीद खान पठाण, बजरंग निखाते, दिगंबर पोल्हे, प्रवीण भालेराव, विश्वास ढगे, बाळासाहेब कांबळे, रामजी बेहडे, निवृत्ती खडसे, विठ्ठल कांबळे, सुभाष सोनुळे, उत्तम इंगोले, यशवंत ढोले आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: May arrest those who have found out about Mayawati