VIDEO : मातोश्री वीणादेवी दर्डा यांची आज पुण्यतिथी, गुरुबानी कार्यक्रमाने भावपूर्ण श्रद्धांजली

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2019 14:37 IST2019-07-19T13:45:32+5:302019-07-19T14:37:50+5:30

सामूहिक श्रद्धांजली अर्पण

Matoshri Vinadevi Darda's death anniversary today, hearty tribute to Gurubani program | VIDEO : मातोश्री वीणादेवी दर्डा यांची आज पुण्यतिथी, गुरुबानी कार्यक्रमाने भावपूर्ण श्रद्धांजली

VIDEO : मातोश्री वीणादेवी दर्डा यांची आज पुण्यतिथी, गुरुबानी कार्यक्रमाने भावपूर्ण श्रद्धांजली

यवतमाळ : मातोश्री वीणादेवी दर्डा यांच्या सातव्या पुण्यतिथी निमित्त शुक्रवारी यवतमाळ येथे त्यांच्या समाधी स्थळावर गुरुबानी कार्यक्रमाने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. 

यावेळी विजयबाबू दर्डा, राजेंद्रबाबू दर्डा, माजी मंत्री शिवजीराव मोघे, आदिवासी विकासमंत्री डॉ. अशोक उईके, माजी आमदार कीर्ती बाबू गांधी, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रवीण देशमुख, माजी उपाध्यक्ष बाळासाहेब मागुलकर, लव दर्डा आदी उपस्थित होते. यावेळी सामूहिक श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. 

मातोश्रीच्या समाधीस्थळ येथे तुळशीवृंदावण विकसित करण्यात आले आहे. अॅड. प्रवीण जानी यांनी श्रद्धांजली सभेचे संचालन केले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती.

Web Title: Matoshri Vinadevi Darda's death anniversary today, hearty tribute to Gurubani program