भाजपा कार्यकर्त्याच्या खुनानंतर आर्णी शहरात बाजारपेठ बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2018 23:51 IST2018-12-14T23:50:59+5:302018-12-14T23:51:51+5:30
अवैध सावकारीतील व्याजाच्या पैशाच्या वादातून येथील भाजपा कार्यकर्ता नीलेश मस्के याचा भरदिवसा तिघांनी निर्घृण खून केल्यानंतर या घटनेच्या चर्चेनेच आर्णीची अर्धी-अधिक बाजारपेठ लगेच बंद करण्यात आली होती.

भाजपा कार्यकर्त्याच्या खुनानंतर आर्णी शहरात बाजारपेठ बंद
लोकमत न्यूज नेटवर्क
आर्णी : अवैध सावकारीतील व्याजाच्या पैशाच्या वादातून येथील भाजपा कार्यकर्ता नीलेश मस्के याचा भरदिवसा तिघांनी निर्घृण खून केल्यानंतर या घटनेच्या चर्चेनेच आर्णीची अर्धी-अधिक बाजारपेठ लगेच बंद करण्यात आली होती. सायंकाळपर्यंत ही बाजारपेठ बंदच होती.
पहूर येथील देठे पिता-पुत्र व त्यांच्या शेतातील नोकराने हा खून केला. खुनानंतर तीनही आरोपी स्वत: पोलिसांना शरण आले. आर्णी उपजिल्हा रुग्णालयात उपचारानंतर नीलेशला यवतमाळला हलविले जात असताना वाटेत त्याचा मृत्यू झाला. यवतमाळात सायंकाळी त्याचे शवविच्छेदन करण्यात आले. यावेळी आर्णीचे आमदार प्रा. राजू तोडसाम उपस्थित होते. नीलेश हा तोडसाम यांचा निकटवर्तीय कार्यकर्ता असल्याचे सांगितले जाते.