शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
2
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
3
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
4
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
5
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
6
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
7
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
8
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
9
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
10
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
11
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
12
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
13
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
14
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
15
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
16
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
17
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
18
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
19
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

मराठा आंदोलन पेटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2018 22:29 IST

मराठा आरक्षणाच्या निमित्ताने राज्यभर सुरू झालेल्या आंदोलनाचे पडसाद बुधवारी उमरखेड विभागातही उमटले. सकल मराठा समाजाच्या या आरक्षणाला अचानक हिंसक वळण मिळाल्याने एसटी बसची तोडफोड व पोलिसांवर दगडफेकीच्या घटना घडल्या.

ठळक मुद्देउमरखेडमध्ये हिंसक वळण : एसटी फोडली, पोलिसांवर दगडफेक

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : मराठा आरक्षणाच्या निमित्ताने राज्यभर सुरू झालेल्या आंदोलनाचे पडसाद बुधवारी उमरखेड विभागातही उमटले. सकल मराठा समाजाच्या या आरक्षणाला अचानक हिंसक वळण मिळाल्याने एसटी बसची तोडफोड व पोलिसांवर दगडफेकीच्या घटना घडल्या.जिल्ह्यात उमरखेडमध्येच मराठा आंदोलनाची धग पहायला मिळाली. काही प्रमाणात पुसद, दिग्रस या भागात आंदोलक रस्त्यावर उतरले. उमरखेडमध्ये सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरुन युती सरकारचा निषेध नोंदविला. बाजारपेठ आधीच बंद ठेवण्यात आली होती. आंदोलक संजय गांधी चौकात (गायत्री चौक) आले असता अचानक त्याला जणू गालबोट लागले. यावेळी कुणी तरी दगडफेक सुरू केली. या दगडफेकीत दराटीचे ठाणेदार सुभाष उन्हाळे व दोन पोलीस कर्मचारी जखमी झाले. शिवाय आंदोलकांपैकी दोघांनासुद्धा दगडफेकीत जखमी व्हावे लागले. यावेळी बंदोबस्ताला असलेले उमरखेडचे उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पुज्जलवार, ठाणेदार हनमंत गायकवाडहेसुद्धा दगडफेकीत सापडले. परंतु डोक्यावर हेल्मेट असल्याने ते जखमी झाले नाही. विडूळ येथेही अज्ञात आंदोलकांनी मार्गपरिवहन महामंडळाच्या दोन बसेसच्या काचा फोडल्या. त्यात तीन प्रवाशांना जखमी व्हावे लागले. हे आंदोलन सुरू असतानाच वकीलांनी कोट जाळून सरकारचा निषेध नोंदविला. आंदोलन हाताबाहेर जात असल्याचे पाहून पुसद, लाडखेड, वणी, दराटी, यवतमाळ पोलीस मुख्यालय येथून अतिरिक्त पोलीस कुमक बोलविण्यात आली. आंदोलनाची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार, अपर पोलीस अधीक्षक अमरसिंह जाधव यांनी उमरखेडला भेट दिली. जाधव अजूनही येथेच तळ ठोकून आहे. दिग्रस शहरामध्ये दिवसभर बाजारपेठ बंद ठेवण्यात आली होती. मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी तेथे ठिय्या आंदोलन केले. पुसद, यवतमाळसह इतरत्र मात्र शांतता होती.पोलीस शिपायाला ठाण्यातच हृदयाघातउमरखेड शहरात रस्त्यावर मराठा समाजाचे आंदोलन पेटलेले असतानाच पोलीस ठाण्यातील स्टेशन डायरीवर ड्युटीवर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याला अचानक हृदयाघात झाला. त्यांना तातडीने नांदेड येथे उपचारार्थ हलविण्यात आले. 

टॅग्स :marathaमराठाreservationआरक्षण