भांडण सोडवायला गेला अन् जीव गमावून बसला; पोलिसांनी दोघांना घेतलं ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2022 18:02 IST2022-10-18T17:59:30+5:302022-10-18T18:02:08+5:30

वेणी येथील घटना

man went to settle a quarrel and died for no reason; police detained two for murder | भांडण सोडवायला गेला अन् जीव गमावून बसला; पोलिसांनी दोघांना घेतलं ताब्यात

भांडण सोडवायला गेला अन् जीव गमावून बसला; पोलिसांनी दोघांना घेतलं ताब्यात

महागाव (यवतमाळ) : दोघांचे भांडण सोडवायला गेलेल्या निरपराध व्यक्तीस नाहक जीव गमवावा लागला. तालुक्यातील वेणी येथे ही घटना घडली. केशव दौलत मोरे (३४) असे मृतकाचे नाव आहे.

रविवारी (दि. १६) रात्री ९.३० वाजेच्या सुमारास प्रशांत पुंडे आणि अंकुश पुंडे यांचा ज्ञानेश्वर गोबे यांच्या सोबत उसाच्या पैशावरून वाद सुरू होता. प्रकरण हाणामारीवर आल्यामुळे शेजारीच राहणारे केशव मोरे मध्यस्थी करण्यासाठी पोहोचले. सामोपचाराने वाद मिटावा म्हणून ते भांडण सोडवित असताना प्रशांत पुंडे याने हातातील लाकडी खाटेचा ठावा केशव मोरे यांच्या डोक्यावर मारला.

ठाव्याच्या प्रहारामुळे केशव मोरे जमिनीवर कोसळले. नातेवाईक संतोष लक्ष्मण मोरे यांनी धाव घेत केशव मोरे यांना उचलून घरी नेले. रात्रीतून प्रकृती खालावल्यामुळे त्यांना सवना ग्रामीण रुग्णालय व नंतर यवतमाळ येथे हलविण्यात आले. उपचारादरम्यान मंगळवारी सकाळी केशव मोरे यांचा दवाखान्यातच मृत्यू झाला. याप्रकरणी संतोष मोरे यांच्या फिर्यादीवरून महागाव पोलिसांनी भादंवि ३०२ व इतर कलमान्वये गुन्हे दाखल केले. आरोपी प्रशांत मधुकर पुंडे व नागोराव ऊर्फ अंकुश मधुकर पुंडे यांना ताब्यात घेतले आहे.

Web Title: man went to settle a quarrel and died for no reason; police detained two for murder