ममता तातेड यांच्या ३१ उपवासाची सांगता

By Admin | Updated: October 6, 2015 03:24 IST2015-10-06T03:24:48+5:302015-10-06T03:24:48+5:30

येथील सुश्रावक इंदरचंदजी तातेड यांच्या पुत्रवधू ममता नवीनचंद तातेड यांच्या ३१ उपवासाच्या सांगता

Mamta Tatead's 31st fasting | ममता तातेड यांच्या ३१ उपवासाची सांगता

ममता तातेड यांच्या ३१ उपवासाची सांगता

बाभूळगाव : येथील सुश्रावक इंदरचंदजी तातेड यांच्या पुत्रवधू ममता नवीनचंद तातेड यांच्या ३१ उपवासाच्या सांगता कार्यक्रमानिमित्त येथे सोमवारी मिरवणूक काढण्यात आली. तातेड यांच्या निवासस्थानाहून निघालेली मिरवणूक गावातील प्रमुख मार्गाने फिरून जैन स्थानकात दाखल झाली.
प.पू. आचार्य जयमलजी म.सा. यांच्या श्रमनीजींच्या प्रमुख उपस्थितीत पचकानी सोहळा पार पडला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून लोकमत यवतमाळ जिल्हा कार्यालय प्रमुख किशोर दर्डा उपस्थित होते. आम्ही जर सांप्रदायवादाला घेऊन पुढे चाललो तर त्यात आमचेच नुकसान आहे. त्यामुळे याबद्दल विचार होणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
प्रसंगी मंचावर अमरचंदजी गुगलिया, शांतीलालजी झांबड उपस्थित होते. आमदार प्रा.डॉ. अशोक उईके यांनी ममता तातेड यांची भेट घेऊन त्यांचे कौतुक केले. यावेळी इंदरचंदजी तातेड, शांतीलाल जैन, अशोकचंद तातेड, प्रकाशचंद छाजेड, डॉ. रिखबचंद जैन, आनंद देवीचंद दर्डा, नथमल जांगडा उपस्थित होते. संचालन प्रा. प्रवीण पगारिया यांनी केले. कार्यक्रमाला समाजबांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. (प्रतिनिधी)

Web Title: Mamta Tatead's 31st fasting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.