शहरं
Join us  
Trending Stories
1
'मोदी तेरी कब्र...' काँग्रेसच्या रॅलीतून पीएम मोदींवर वादग्रस्त टीका; भाजपचा पलटवार...
2
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
3
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
4
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
5
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
6
आता '४ दिवसीय आठवडा' शक्य! कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; नवीन कामगार कायद्यात '३ दिवस सुट्टी'ची तरतूद
7
नाईट क्लबमध्ये आग, दिल्लीत मेसेज पोहोचला अन् लुथरा ब्रदर्स थांयलंडमध्ये; पडद्यामागे काय घडलं? Inside Story
8
'डिजिटल अरेस्ट' च्या जाळ्यात अडकली, ३३ लाखांची आरटीजीएसही करायला बँकेती गेली; मॅनेजरच्या लक्षात आले...
9
विमानात अमेरिकन महिलेचा श्वास गुदमरू लागला, देवदूत बनून धावली काँग्रेसची महिला नेता आणि वाचवले प्राण   
10
रेपो रेट कपातीनंतरही FD वर बंपर रिटर्न! SBI मध्ये २ लाख जमा करून मिळेल ८३,६५२ रुपये निश्चित व्याज
Daily Top 2Weekly Top 5

आईवर हात उगारताच लहान्याचा संताप अनावर; मोठ्या भावाला चाकूने भोसकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2022 16:38 IST

भावाच्या आतताईपणामुळे आपण काय चूक केली हे लक्षात येताच लहान भावाने हंबरडा फोडला. पोलिसांनी त्याला अटक करून न्यायालयात हजर केले. न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

ठळक मुद्देमाळीपुरातील हत्याकांड : ढसाढसा रडला लहान भाऊ, दोन दिवस पोलीस कोठडी

यवतमाळ : दारूच्या नशेत हिस्सेवाटणीसाठी वाद करायला आलेल्या मोठ्या भावाने आईवरच हात उगारला, आई जमिनीवर कोसळली हे दृश्य पाहून लहान भावाचा संताप अनावर झाला. त्याने घरातील धारदार चाकूने मोठ्या भावावर सपासप वार केले. ही घटना मंगळवारी सकाळी १० वाजता माळीपुरा परिसरात घडली. भावाच्या आतताईपणामुळे आपण काय चूक केली हे लक्षात येताच लहान भावाने हंबरडा फोडला. पोलिसांनी त्याला अटक करून न्यायालयात हजर केले. न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

येथील टांगा चौकात राहुल मनोहर बाचलकर (३६) आणि सतीश मनोहर बाचलकर (३२) या दोन भावांची वेगवेगळी फुलांची दुकाने आहेत. काही दिवसांपासून मोठा भाऊ राहुल हा व्यसनाच्या आहारी गेला होता. त्याने शेतीच्या वाटणीसाठी तगादा लावला. सोमवारी दोन्ही भावांच्या शेतीची नातेवाईकांनी मादणी शिवारात जाऊन वाटणी करून दिली. शेतातच मोठा भाऊ राहुल याने शिवीगाळ करून सतीशवर दगडाने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र, नातेवाईकांनी दोघांची समजूत काढून त्यांना घरी आणले.

वाद मिटला असे समजून नातेवाईक निघून गेले. दुसऱ्या दिवशी राहुल धारदार शस्त्र घेऊन आई राहत असलेल्या घरापुढे पोहोचला. त्याला परिसरातील महिलांनी आवरून त्याच्या जवळचे शस्त्र काढून घेतले. नंतर पुन्हा तो घरी जाऊन परत आईच्या घरासमोर येऊन वाद घालू लागला. तो प्रसंग पाहून आईने लहान मुलाला घराबाहेर पडू नको असे सांगितले. आई दारात उभी राहून मोठा मुलगा राहुल याची समजूत काढत होती. यातच राहुलने आईवर हात उगारला. ती कोसळली. हे पाहून घरात असलेल्या सतीशचा संताप अनावर झाला. त्याने हाती लागलेला चाकू घेऊन राहुलच्या अंगावर चाल केली. चाकूचे वर्मी घाव बसल्याने राहुल जागेवरच कोसळला.

दोन दिवसांच्या पोलीस कोठडीत रवानगी

मोठ्या भावाचा चाकून भोसकून खून केल्यानंतर काही मिनिटातच लहान भाऊ सतीश भानावर आला. आपल्या हातून मोठी अघटित घटना घडल्याचे पाहून तो ओक्साबोक्शी रडू लागला. पोलीस येईपर्यंत सतीश घरीच बसून होता. त्याला शहर पोलिसांनी अटक करून मंगळवारी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने दोन दिवसांची कोठडी सुनावली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीyavatmal-acयवतमाळ