शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! ९१ ड्रोन... युक्रेनचा पुतीन यांना मारण्याचा प्रयत्न; निवासस्थानाजवळ घातकी ड्रोन पाडले अन्...
2
ब्रह्मपुत्रेच्या काठी हिंदूंच्या रक्ताचा पूर! २०० हून अधिक हल्ले, बांगलादेशातील 'या' जिल्ह्यात हिंदूंचे अस्तित्व धोक्यात
3
इराणवर सर्वात मोठा हल्ला होईल, तो थांबवता येणार नाही; डोनाल्ड ट्रम्प यांचे मोठे विधान
4
भारतातील १० सर्वात मोठ्या कंपन्यांच्या बाजार भांडवलात मोठा चढ-उतार, SBI च्या गुंतवणूकदारांना सर्वाधिक नुकसान
5
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान बेगम खालिदा झिया यांचे ८० व्या वर्षी निधन; मुलगा १७ वर्षांनी परतताच...
6
हिंगोलीकरांची पहाट भीतीदायक! पिंपळदरी, नांदापूर परिसरात धरणी माता हादरली; पहाटे ५:५६ची ती वेळ...
7
नात्याला काळिमा! नराधम पित्याचा १३ वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार; पोलीस आईनेच पतीला धाडले गजाआड
8
कर्ज, किडनी आणि गांजा : शेतकरी या मार्गाने का निघाले?
9
इस्त्रायलच्या सुंदर तरुणी सैनिक का बनतात? 
10
नाशिकच्या श्री काळाराम मंदिराच्या विश्वस्तपदासाठी राजकारण्यांचे वावडे
11
विनाशकारी विकासाला नकार! अरवलीचे संरक्षण म्हणजे विकासाला विरोध नव्हे...
12
"...तर इस्रायल संपला असता!" ट्रम्प यांनी केलं नेतन्याहूंचं कौतुक, ५ मिनिटांत ३ मोठे प्रश्न लावले मार्गी!
13
राज्यातील वाढते रस्ते अपघात रोखा; नितीन गडकरींचे CM ना पत्र, तातडीने उपाययोजना करायची सूचना
14
केंद्र सरकारने साखरेचा विक्री दर वाढवावा; शरद पवार घेणार केंद्रीय मंत्री अमित शाह यांची भेट 
15
आजचे राशीभविष्य ३० डिसेंबर २०२५ : मेष आणि मिथुन राशीला भाग्याची साथ, तर कन्या अन् धनु राशीने...
16
येमेनच्या नागरिकाच्या अटकेचा भार सरकारी तिजोरीवर; खटला निकाली काढा, मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश
17
शिक्षक भरती : प्रमाणपत्र अटीमुळे मराठा उमेदवार होणार बेरोजगार? खुल्या प्रवर्गातून अर्ज भरलेल्यांमध्ये तीव्र नाराजी
18
चारित्र्याच्या संशयातून पत्नी व चार वर्षीय मुलाचा निर्घृण खून
19
नवी मुंबई, मिरा-भाईंदर, उल्हासनगरात युती तुटली; मुंबई, ठाण्यात युतीचे जमले; केडीएमसी, पनवेल, वसई-विरारमध्ये युतीचे संकेत 
20
मोठी दुर्घटना टळली! डायलिसिस उपचार केंद्रात आग, काच फोडून आठ जणांना वाचविले; उमरखेड येथील रुग्णालयातील घटना
Daily Top 2Weekly Top 5

मोठी दुर्घटना टळली! डायलिसिस उपचार केंद्रात आग, काच फोडून आठ जणांना वाचविले; उमरखेड येथील रुग्णालयातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2025 07:14 IST

उमरखेड येथील उपजिल्हा रुग्णालयातील घटना...

उमरखेड (जि. यवतमाळ) : उपजिल्हा रुग्णालयातील मोफत डायलिसिस सेवा केंद्रात सोमवारी दुपारी दीड वाजता शाॅर्टसर्किट झाल्याने खळबळ उडाली. कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान दाखवत खिडकीची काच फाेडून आठ रुग्णांना बाहेर काढून त्यांचे जीव वाचविले, तर काही कर्मचाऱ्यांनी फायर सिलिंडरने शाॅर्टसर्किटवर नियंत्रण मिळविल्याने पुढील अनर्थ टळला.  शासकीय उपजिल्हा रुग्णालयाच्या आवारात उमरखेड-महागाव तालुक्यातील रुग्णांना डायलिसिस उपचारासाठी मोफत केंद्र उघडण्यात आले आहे. साेमवारी दुपारी अचानक फटाक्यासारखा आवाज होऊन शॉर्टसर्किटमुळे डायलिसिस केंद्र धुराने घेरले गेले. आरडाओरड करणाऱ्या रुग्णांना कर्मचाऱ्यांनी खिडकीच्या काचा फोडून बाहेर काढले. सुदैवाने यात जीवितहानी अथवा कुणीही गंभीर जखमी झाले नाही.  

सगळीकडे धूरच धूर डायलिसिस केंद्र धुराने घेरले गेले. आरडाओरड करणाऱ्या रुग्णांना बाहेर काढण्यासाठी कर्तव्यावर असणाऱ्या कर्मचाऱ्यांनी रुग्णांना खिडकीच्या काचा फोडल्या. वीज वितरण कंपनीला फोन लावून वीजपुरवठा बंद केला. रूग्णांना  सुरक्षित बाहेर काढले. त्यानंतर रुग्णांवर बाहेर उपचार करण्यात आले

मागील अनेक दिवसांपासून वीज ये-जा, हायव्होल्टेज व लो व्होल्टेजचा प्रकार सुरू आहे. जनरेटर उपलब्ध असतानाही कंपनीकडून त्याचा नियमित वापर केला जात नसल्याचे सांगण्यात येते. डॉ. एस. पी. डांगे, प्रभारी वैद्यकीय अधीक्षक, उपजिल्हा रुग्णालय, उमरखेड

डाॅक्टरविनाच सुरू आहे उपचार केंद्रराज्यात एचएलएल कंपनीमार्फत मोफत डायलिसिस केंद्र राज्य सरकार चालवीत आहे.  या केंद्रात डॉक्टरची नेमणूक करण्याची जबाबदारी ही कंपनीची आहे. मात्र, येथील डायलिसिस केंद्र सुरू होऊन सहा महिने झाले येथे डॉक्टरची नियुक्ती केली नसल्याची गंभीर बाबत यानिमित्ताने समोर आली आहे. 

शॉर्टसर्किटने सतत फटाक्यासारखा आवाज येत होता. धुरामुळे नेमकी आग समजून येत नव्हती. तरीही कर्तव्यावर असणाऱ्या नऊ कर्मचाऱ्यांनी भांबावून न जाता प्रसंगावधान दाखवून उपचार घेत असलेल्या आठ रुग्णांना सुखरूप बाहेर काढले.

English
हिंदी सारांश
Web Title : Major accident averted! Fire at dialysis center, eight rescued.

Web Summary : A short circuit sparked a fire at a dialysis center in Umarkhed, Yavatmal. Staff broke windows, rescuing eight patients. No serious injuries occurred. The center lacks a designated doctor, raising concerns about patient safety during such incidents.
टॅग्स :YavatmalयवतमाळAccidentअपघातhospitalहॉस्पिटल