शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
IND vs PAK Asia Cup 2025 Final Live Streaming : भारत-पाक 'महायुद्ध'! कुठं अन् कशी पाहता येईल ऐतिहासिक फायनल?
3
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
4
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
5
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
6
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
7
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
8
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
9
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
10
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
11
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
12
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
13
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
14
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
15
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
16
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
17
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
18
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
19
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
20
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?

‘मजिप्रा’चा ना एसएमएस, ना फोन, विचारणार कोण?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2018 22:17 IST

पाणी समस्येवर मात करण्यासाठी जीवन प्राधिकरण व्हॉट्सअप ग्रुप तयार करेल. त्यात पाणी सोडल्या जाणाऱ्या नगराचे नाव आणि वेळ कळविण्यात येईल, असा शब्द कार्यकारी अभियंत्यांनी पालकमंत्र्यांना बैठकीत दिला होता.

ठळक मुद्दे४० दिवसांपासून पाणी नाही : पालकमंत्र्यांच्या शब्दाला खो

रुपेश उत्तरवार।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : पाणी समस्येवर मात करण्यासाठी जीवन प्राधिकरण व्हॉट्सअप ग्रुप तयार करेल. त्यात पाणी सोडल्या जाणाऱ्या नगराचे नाव आणि वेळ कळविण्यात येईल, असा शब्द कार्यकारी अभियंत्यांनी पालकमंत्र्यांना बैठकीत दिला होता. प्रत्यक्षात बैठक संपल्यानंतर हा कार्यक्रमही गारद झाला. काही भागात सतत चार दिवस नळ येत आहेत अन् काही भागात ४० दिवस पाणीच नाही, अशी बेभरवशाची स्थिती आहे.यवतमाळ शहराच्या पाणीपुरवठ्याची भिस्त असणाऱ्या प्रकल्पातला पाणीसाठा संपला आहे. फ्लोटिंग पंपच्या माध्यमातून पाण्याचा उपसा सुरू आहे. संकलित पाणी टाक्यामध्ये भरून पाण्याचा पुरवठा करण्यात येतो. कुठल्या भागात कधी पाणी सोडायचे, याचे वेळापत्रक प्राधिकरणाकडे आहे. हे वेळापत्रक नगरसेवकांपर्यंत पोहोचविण्यासाठी कार्यकारी अभियंत्यांनी पुढाकार घेतला होता. त्याची ‘अपडेट’ माहिती नगरसेवकांना दिली जाईल, अशी कबुली प्रभारी कार्यकारी अभियंता अजय बेले यांनी पालकमंत्री मदन येरावार यांच्या समक्ष दिली होती.प्रत्यक्षात बैठक संपल्यानंतर त्या दृष्टीने ग्रूप तयार झाला नाही. यामुळे कधी कुठल्या प्रभागात कुठल्या वेळी नळ येणार याची माहिती नगरसेवकांना मिळत नाही. यामुळे सर्वसामान्यांपर्यंत ती माहिती पोहोचत नाही. यातून प्रत्येक भागात स्फोटक स्थिती निर्माण झाली. पाण्यासाठी मोर्चे निघत आहे. या भागातील नागरिकांना पाणी कधी मिळेल, याचे आश्वासनही देता येत नाही. यामुळे नगरसेवकांप्रती रोष वाढत आहे.नागरिकांचे तारखांवर लक्षपालकमंत्र्यांसह काही पदाधिकारी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यानी वारंवार अमूक तारखेपर्यंत पोहोचण्याची ग्वाही दिली होती. या तारखांकडे नागरिकांचे लक्ष लागून होते. मात्र त्यापैकी काही तारखा उलटून गेल्या तर काही तारखा आठवडाभरावर येऊन ठेपल्यातरी शहरात पाणी पोहोचले नसल्याने नागरिकांत संताप आहे.पाणी वाटप कोलमडलेशहरात पाणी वाटपाचे वेळापत्रकच उरले नाही. जीवन प्राधिकरणाने १२ दिवसाआड पाणी देण्याचे जाहीर केले. प्रत्यक्षात २० ते ४० दिवसात पाणी मिळत नाही. प्रत्येक भागात किती तास नळ ठेवायचे, याचेही वेळापत्रक नाही. यामुळे कुठे दिवसभर पाणी सुरू राहते. तर काही ठिकाणी दोन तासात नळ जातात. काही भागामध्ये सतत चार ते पाच दिवस नळ राहतात. तर त्याच्याच बाजूच्या नगरात ३० ते ४० दिवसांपासून पाणी नसते. असे का होते, याचे उत्तर प्राधिकरणाने अद्यापही स्पष्ट केले नाही. यामुळे सर्वसामान्य जनतेत प्रचंड रोष आहे.