यवतमाळ जिल्ह्यात वणीतील माहेर कापड केंद्राला ५० हजारांचा दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 11:05 IST2021-05-11T11:05:25+5:302021-05-11T11:05:50+5:30
कोरोना संसर्ग रोखण्यासाठी घालण्यात आलेल्या निर्बंधानंतरही चोरीच्या मार्गाने कापड विक्री करणाऱ्या यवतमाळ येथील माहेर कापड केंद्रावर पोलीस, नगरपालिका व महसूल प्रशासनाने मंगळवारी सकाळी अचानकपणे धाड टाकून प्रतिष्ठाणाच्या संचालकाला ५० हजारांचा दंड ठोठावला.

यवतमाळ जिल्ह्यात वणीतील माहेर कापड केंद्राला ५० हजारांचा दंड
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ: कोरोना संसर्ग रोखण्यासाठी घालण्यात आलेल्या निर्बंधानंतरही चोरीच्या मार्गाने कापड विक्री करणाऱ्या येथील माहेर कापड केंद्रावर पोलीस, नगरपालिका व महसूल प्रशासनाने मंगळवारी सकाळी अचानकपणे धाड टाकून प्रतिष्ठाणाच्या संचालकाला ५० हजारांचा दंड ठोठावला. तसेच दुकानातील ग्राहकांकडून दंडापोटी प्रत्येकी ५०० रुपये वसुल करण्यात आले. या कारवाईने वणीच्या व्यापारी वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे. ही कारवाई वणीचे तहसीलदार विवेक पांडे, ठाणेदार वैभव जाधव व नगरपालिकेच्या पथकाने केली.