शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत उत्तर द्या, अन्यथा...; विजय वडेट्टीवार यांना न्यायालयाचा अवमान केल्याची नोटीस
2
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
3
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
4
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
5
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
6
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
7
४,४,४,४,४,४,६,४,६,६! जॅक फ्रेझर मॅकगर्कची वादळी फिफ्टी; आर अश्विनने RR मिळवून दिली पहिली विकेट 
8
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!
9
रिषभची विकेट घेऊन युझवेंद्र चहलने इतिहास घडवला; IPL अन् ट्वेंटी-२०त पराक्रम करणारा पहिला भारतीय
10
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
11
'अडीच कोटीत EVM हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
12
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात ५४.०९ टक्के मतदान
13
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
14
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
15
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
16
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
17
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
18
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
19
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
20
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात

महाराष्ट्राच्या शिक्षणाचा निर्देशांक देशात अव्वल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2020 7:00 AM

लोकसंख्या आणि राज्याचा भौगोलिक आवाका लक्षात घेता महाराष्ट्राची शैक्षणिक कामगिरी अव्वल ठरल्याचे केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.

ठळक मुद्देवर्षभरात ‘पीजीआय’चा पटकावला पहिला ग्रेडकेंद्र शासनाचा अहवाल

अविनाश साबापुरे।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : देशभरातील शाळांचा कामगिरी अहवाल (परफॉर्मन्स ग्रेडिंग इन्डेक्स) केंद्र शासनाने जाहीर केला असून त्यात महाराष्ट्राने अव्वल स्थान पटकाविले आहे. विशेष म्हणजे, लोकसंख्या आणि राज्याचा भौगोलिक आवाका लक्षात घेता महाराष्ट्राची शैक्षणिक कामगिरी अव्वल ठरल्याचे केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.नॅशनल अचिव्हमेंट सर्वे, यू-डायस प्लस, एमडीएम आणि शगुन पोर्टलच्या माध्यमातून शाळांची आकडेवारी गोळा करून पीजीआय इन्डेक्स जाहीर केला जातो. त्यात विद्यार्थ्यांची गुणवत्ता, शिक्षकांची संख्या, अध्ययनाची अद्ययावतता, शाळेतील भौतिक सोई-सुविधा, प्रयोगशाळा, क्रीडांगण अशा जवळपास ७० निकषांवर मूल्यमापन केले जाते. या ७० निकषांच्या आधारे एकूण एक हजार गुण दिले जातात. २०१७-१८ मध्ये महाराष्ट्राने या एक हजारपैकी ७०० गुण मिळविल्याने तिसऱ्या श्रेणीवर समाधान मानावे लागले होते. मात्र २०१८-१९ या शैक्षणिक वर्षात महाराष्ट्राने एक हजार पैकी ८०० गुण मिळवून पहिली श्रेणी पटकाविली. विशेष म्हणजे ७० निकषांचा विचार करता चंदीगड, गुजरात आणि केरळ या राज्यांनी ८०० पेक्षा जास्त गुण मिळविले आहेत. मात्र राज्यांचा भौगोलिक विस्तार आणि तेथील लोकसंख्या यांचा विचार करता चंदीगड ३१, गुजरात ९, केरळ १३, दिल्ली १९ आणि महाराष्ट्राला दुसरी रँक मिळाल्याचे अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. तर याच पद्धतीने अरुणाचल प्रदेश, मेघालय, नागालॅन्ड, मनीपूरला अनुक्रमे २८, २४, २६ आणि २५ वी रँक देण्यात आली.शिक्षकांच्या तुटवड्यावर शिक्कामोर्तबशिक्षक, मुख्याध्यापक आणि पर्यवेक्षकीय यंत्रणेतील रिक्त पदे, त्यामुळे अध्यापन-पर्यवेक्षणाकडे होणारे दुर्लक्ष यातून अनेक राज्यांचा पीजीआय निर्देशांक कमी असल्याचे अहवालात म्हटले आहे. हजार पैकी ९५० गुण मिळविणाºया राज्यांचा समावेश पीजीआयच्या पहिल्या स्तरात केला जातो. मात्र गेल्या दोन अहवालांपैकी एकदाही एकही राज्य पहिल्या स्तरात समाविष्ट होऊ शकले नाही. तर ५५० ते ६०० गुण मिळविणाºया राज्यांचा समावेश सर्वात शेवटच्या म्हणजे सहाव्या स्तरात समावेश होतो. यंदा त्यात एकमेव अरुणाचल प्रदेश आहे. यावरून देशातील शैक्षणिक स्थिती मध्यम स्वरूपाची असल्याचे निष्पन्न होते.वर्षभरात दिल्लीची बरोबरीपीजीआयच्या ७० निकषांमध्ये सर्वात महत्वाचा असलेल्या शाळेतील भौतिक सोई-सुविधा, इमारती या एका निकषात देशात पहिला क्रमांक पटकाविला. विशेष म्हणजे दिल्ली आणि महाराष्ट्र राज्यातील लोकसंख्या, भौगोलिक विस्तार लक्षात घेता या निकषाच्या बाबतीत ही दोन्ही राज्ये अहवालात एकाच श्रेणीत समाविष्ट करण्यात आली.गेल्या वेळी ज्या ज्या बाबींमध्ये आपण कमी पडलो, तेथे अधिक लक्ष केंद्रित केल्याने एकूण गुणांकनात आपला क्रमांक वर गेला. अन्य राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील विद्यार्थी, शिक्षक आणि शाळांची संख्या खूप मोठी आहे. त्यामुळे अहवालात आपल्याला आपली श्रेणी वरचढ ठरल्याचे भाष्य झाले असावे.- दिनकर पाटील, शिक्षण संचालक२०१६ पासूनच आम्ही परिणामांचा विचार करून शैक्षणिक क्षेत्रात विविध उपक्रम सुरू केले होते. त्याचा एकत्रित परिणाम आता दिसू लागला आहे. त्यामुळे पीजीआय वाढला असावा.- नंदकुमारमाजी शिक्षण सचिव

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्र