शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
2
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
3
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
4
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
5
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
6
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
7
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
8
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
9
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
10
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
11
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
12
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
13
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
14
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
15
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
16
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
17
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
18
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
19
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
20
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!

Maharashtra Election 2019 : ईव्हीएम हॅक न झाल्यास सत्तेवर येऊ - प्रकाश आंबेडकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2019 16:42 IST

यापूर्वी लोकसभा निवडणुकीत व तत्पूर्वीही मोठ्या प्रमाणात ईव्हीएम मशीन हॅक झाल्या.

यवतमाळ : यापूर्वी लोकसभा निवडणुकीत व तत्पूर्वीही मोठ्या प्रमाणात ईव्हीएम मशीन हॅक झाल्या. त्यामुळे भाजपप्रणीत सरकार सत्तेवर आले. यावेळी ईव्हीएम हॅक न झाल्यास वंचित बहुजन आघाडी राज्यात सत्तेवर येईल, अशी अपेक्षा वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केली. विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने शनिवारी ते यवतमाळात पत्रकारांशी संवाद साधत होते.ते म्हणाले, ईव्हीएम नसते तर लोकसभेत आम्ही 12 जागांवर विजय मिळविला असता. मात्र आता ईव्हीएम हॅकरच आपला व्यवसाय बुडण्याच्या भीतीने ईव्हीएम हॅक करणार नाही, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला. भाजप देशात चुकीचे चित्र रंगवते, असा आरोप त्यांनी केला. लोकांना बदल पाहिजे असून सध्या बँका डुबण्याच्या अवस्थेत आहे. शासनाची तिजोरी रिकामी आहे. व्यापारी, कारखानदार, कामगार सर्वच घटक सरकारमुळे त्रस्त आहे. कापसाचे दर चार हजार क्विंटल दर जात नाही. या सर्वबाबींमुळे जनता त्रस्त झाली असून, या निवडणुकीत आम्हीच खरे विरोधी पक्ष असल्याचे समोर येईल, असेही त्यांनी सांगितले. वंचित बहुजन आघाडी सत्तेवर आल्यास लघू आणि मध्यम उद्योगांना उभारी देऊन कृषी उद्योग निर्माण करू यामुळे रोजगार वाढेल, ओबीसी विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती लागू करू, दुष्काळी भागात शेतीसाठी पाण्याची व्यवस्था करू आदी आश्वासने त्यांनी दिली. विधानसभेत भाजप-शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडीतच खरी लढत असल्याचे अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केले. राज्यात वंचितने 272 उमेदवार दिल्याचेही त्यांनी सांगितले. आम्ही टीकेचे राजकारण सोडून ‘मेन स्ट्रीम डेव्हलपमेंट’बाबत जनतेला समजावून सांगत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या पत्रकार परिषदेला यवतमाळचे उमेदवार योगेश पारवेकर, राळेगावचे उमेदवार माधव कोहळे, अ‍ॅड. राजेंद्र महाडोळे, बालमुकुंद भिरड, अ‍ॅड. श्याम खंडारे, रमेश गिरोळकर, राजू तलवारे, राजा गणवीर, रणधीर खोब्रागडे आदी उपस्थित होते.

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019