शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

Maharashtra Election 2019 : नरेंद्र मोदी अदानी-अंबानींचे लाऊड स्पीकर- राहुल गांधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2019 17:04 IST

नरेंद्र मोदी अदानी-अंबानींचे लाऊड स्पीकर आहेत.

वणी (यवतमाळ) : नरेंद्र मोदी अदानी-अंबानींचे लाऊड स्पीकर आहेत. देशातील प्रत्येक मोठी कंपनी ते खासगीकरणाच्या नावाखाली या उद्योजकांच्या हवाली करीत आहे. एक दिवस संपूर्ण देश ते विकून टाकतील, असा घणाघती आरोप काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मंगळवारी येथे केला. वणीसह यवतमाळ जिल्ह्यातील काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारासाठी येथील शासकीय मैदानावर आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते.लोकसभा निवडणुकीपूर्वी मोदीजींनी देशातील प्रत्येक नागरिकांच्या खात्यात 15 लाख रुपये टाकले जातील, असे आश्वासन दिले होते. ते मिळाले काय, कापसाला सहा हजार रुपये प्रति क्विंटल भाव देण्याचे आश्वासनही त्यांनी दिले होते. सहा हजार रुपये भाव कापसाला दिला जात आहे काय, असे अनेक प्रश्न त्यांनी उपस्थित जनसमुदायाला विचारले. जनसमुदायाने त्यांच्या या प्रश्नाला प्रतिसाद देत एकसुरात नाही, असे उत्तर दिले.नरेंद्र मोदी जेथे जातात, तेथे खोटे बोलतात. ते कधी चंद्राची गोष्ट करतात, तर कधी कलम 370च्या विषयावर चर्चा करतात. शेतकरी व बेरोजगारांच्या प्रश्नावर मात्र त्यांचे मौन असते. गरिबांना लुटून अंबानी-अदानीचे खिसे भरण्याचे काम नरेंद्र मोदी करत असल्याचा आरोपही राहुल गांधी यांनी यावेळी केला. या देशाची अर्थव्यवस्था अदानी-अंबानी नाही, तर देशातील सर्वसामान्य गरीब नागरिक चालवित आहेत. त्यामुळे सर्वसामान्य माणसांची आर्थिक परिस्थिती सुधारावी, हे काँग्रेसचे ध्येयधोरण आहे. परंतु नरेंद्र मोदींचा कारभार याऊलट सुरू आहे. ते अदानी-अंबानीचे स्पिकर बनून सामान्यांचे लक्ष विचलित करीत आहेत. सामान्यांचे लक्ष विचलित झाले की त्यांच्या खिशातून पैसे काढून ते अदानी-अंबानीच्या हवाली करत असल्याचे राहुल गांधी म्हणाले.यावेळी त्यांनी माध्यमांवरदेखील सडकून टीका केली. या देशातील प्रसारमाध्यमे केवळ नरेंद्र मोदी यांचे कौतुक करण्यात गुंतले आहेत. परंतु देश रसातळाला नेण्याचे काम करणा-या मोदींविरुद्ध माध्यमे एक शब्दही लिहायला व दाखवायला तयार नाहीत. हे सर्व प्रसारमाध्यमे देशातील करोडपती उद्योजकांच्या नियंत्रणात असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी यावेळी केला. राहुल गांधी यांचे भाषण ऐकण्यासाठी वणी विधानसभा मतदारसंघातील हजारो लोक उपस्थित होते. व्यासपीठावर काँग्रेसचे प्रभारी मल्लिकार्जुन खरगे, प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, अ‍ॅड. शिवाजीराव मोघे, प्रा. वसंत पुरके, माणिकराव ठाकरे, खासदार सुरेश धानोरकर, वणी विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार वामनराव कासावार, विरोधी पक्षनेता विजय वडेट्टीवार, काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष वजाहत मिर्झा, प्रकाश देवतळे, विजय खडसे आदी उपस्थित होते.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019