शहरं
Join us  
Trending Stories
1
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
2
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
3
आजचे राशीभविष्य, २६ ऑगस्ट २०२५: वाद-विवादापासून दूर राहा, गोड बोलून कामे पूर्ण कराल
4
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा
5
'रिझर्व्हेशन'ची स्पेलिंगही न येणारे मुंबईला निघाल्यास ओबीसी रस्त्यावर उतरतील: लक्ष्मण हाकेंचा इशारा
6
२६ लाख लाडक्या बहिणींचे मानधन रोखले, छाननीचे काम सुरू, २.२९ कोटी बहिणींचे मानधन मात्र सुरूच
7
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
8
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
9
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
10
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
11
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
12
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
13
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
14
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
15
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
16
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
17
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
18
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
19
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
20
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!

यवतमाळ जिल्हा परिषदेवर अखेर महाविकास आघाडीची सत्ता

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2020 13:50 IST

यवतमाळ जिल्हा परिषदेवर सोमवारी अखेर महाविकासआघाडीची सत्ता स्थापन झाली आहे.

ठळक मुद्देयवतमाळ जिल्हा परिषदेवर सोमवारी अखेर महाविकासआघाडीची सत्ता स्थापन झाली आहे. अध्यक्षपदी शिवसेनेच्या कालिंदा पवार तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसची क्रांती उर्फ बाळासाहेब कामारकर यांची बिनविरोध निवड.महाविकासआघाडीत सहभागी असलेल्या काँग्रेसला दोन सभापती पदे दिली जाणार आहेत.

यवतमाळ - यवतमाळ जिल्हा परिषदेवर सोमवारी (13 जानेवारी) अखेर महाविकास आघाडीची सत्ता स्थापन झाली आहे. अध्यक्षपदी शिवसेनेच्या कालिंदा पवार तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसची क्रांती उर्फ बाळासाहेब कामारकर यांची बिनविरोध निवड झाली. 

नामांकन दाखल करण्यासाठी दुपारी एक वाजेपर्यंत वेळ होती. मात्र या वेळेत केवळ कालिंदा पवार व कामारकर यांचेच नामांकन दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली. या निवडीची औपचारिक घोषणा तेवढी बाकी आहे. 18 सदस्य असलेल्या भाजपाने अखेरच्या क्षणापर्यंत काही तडजोडी होते का या दृष्टीने प्रयत्न केले. सदस्यांची बैठकही घेतली. परंतु महाविकास आघाडी एकजूट असल्याने भाजपाला यश आले नाही. शिवसेनेने शिक्षण सभापती असलेल्या कालिंदा पवार यांना बढती देत जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पद दिले. या माध्यमातून वनमंत्री संजय राठोड यांनी अध्यक्षपद आपल्या दिग्रस विधानसभा मतदारसंघात नेले आणि कालिंदा पवार यांना अध्यक्षपदी संधी देऊन मराठा समाजाला खूश करण्याचाही प्रयत्न केला. 

उपाध्यक्ष पदावर क्रांती कामारकर यांच्या रुपाने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी मंत्री मनोहरराव नाईक व आमदार इंद्रनील नाईक यांचे वर्चस्व राहिल्याचे मानले जाते. महाविकासआघाडीत सहभागी असलेल्या काँग्रेसला दोन सभापती पदे दिली जाणार आहेत. तर अन्य दोन सभापतीपदावर शिवसेनेने दावा सांगितला आहे.

महत्त्वाच्या बातम्या 

JNU Attack : JNU हिंसाचार प्रकरणी दिल्ली हायकोर्टाची फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप आणि गुगलला नोटीस

यूपीएससीच्या आयईएस परीक्षेत जेएनयूच्या विद्यार्थ्यांचा दबदबा; पटकावल्या 32 पैकी 18 जागा

जेएनयूचे कुलगुरू जगदीशकुमार हेच हल्ल्यामागील मास्टरमाइंड; काँग्रेसचा आरोप

JNU भेटीचा दीपिका पादुकोणला असाही फटका, वाचा सविस्तर

ब्रह्मांड असेपर्यंत छत्रपतींची बरोबरी कोणीही करू शकणार नाही; अखेर राज्य भाजपानं मौन सोडलं

 

टॅग्स :YavatmalयवतमाळShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेस