‘वसंत’च्या अध्यक्षपदी माधवराव माने

By Admin | Updated: June 15, 2017 01:02 IST2017-06-15T01:02:28+5:302017-06-15T01:02:28+5:30

विदर्भातील सहकारी तत्त्वावर सुरू असलेल्या एकमेव पोफाळी येथील वसंत सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी

Madhavrao Mane as President of 'Vasant' | ‘वसंत’च्या अध्यक्षपदी माधवराव माने

‘वसंत’च्या अध्यक्षपदी माधवराव माने

बिनविरोध निवड : कारखान्याच्या इतिहासात प्रथमच भाजपचा झेंडा
लोकमत न्यूज नेटवर्क
महागाव : विदर्भातील सहकारी तत्त्वावर सुरू असलेल्या एकमेव पोफाळी येथील वसंत सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी भाजपाच्या सहकार आघाडीचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.माधवराव माने यांची बुधवारी अविरोध निवड करण्यात आली. कारखान्याच्या इतिहासात पहिल्यांदाच सर्वपक्षीय संचालकांच्या सहकार्याने भाजपाचा झेंडा फडकला.
वसंतचे तत्कालिन अध्यक्ष हदगावचे माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी राजीनामा दिल्याने अध्यक्षपद रिक्त होते. बुधवारी दुपारी १ वाजता उमरखेडचे सहायक निबंधक सुनील भालेराव यांच्या अध्यक्षतेत कारखान्याच्या अध्यक्षाची निवडणूक घेण्यात आली. यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ संचालक शिवाजीराव सवनेकर यांनी माने यांचे नाव सुचविले. तर राष्ट्रवादीचे रमेश चौधरी यांनी अनुमोदन दिले. ठरल्यानुसार सर्वपक्षीय संचालकांच्या सहकार्याने माने यांची निवड झाली.
यावेळी कारखान्याचे माजी अध्यक्ष माधवराव पाटील जवळगावकर अनुपस्थित होते. तर भाजपाचे ज्येष्ठ नेते वसंतराव कान्हेकर, विनोद जिल्लेवार, धनंजय अत्रे, महेश नाईक, कारखान्याचे उपाध्यक्ष कृष्णा देवसरकर, संचालक कल्याणराव माने, सुभाष जाधव, नानाराव चव्हाण, राजू मोतेवार, रमन रावते, चितांगराव कदम, विलास मोरे, रेखा वानखेडे, कमलाबाई नाईक यांच्यासह माजी कुलगुरू शेषराव सूर्यवंशी, ऊस उत्पादक संघाचे अध्यक्ष तातेराव चव्हाण, विजयराव जाधव, रामराव नरवाडे, ब.मो. शर्मा, अ‍ॅड.आदित्य माने उपस्थित होते.
अतिशय विपरीत परिस्थितीत कारखान्याच्या अध्यक्षपदाची धुरा संचालकांनी माझ्या खांद्यावर सोपविली. भविष्यात कारखान्याच्यासमोर अडचणीचे डोंगर उभे राहू शकतात. परंतु सर्वांच्या सकारात्मक भूमिकेतून कारखान्याची घडी बसविणार असल्याचे नवनियुक्त अध्यक्ष माधवराव माने यांनी यावेळी सांगितले. कारखान्याचा गळीत हंगाम वेळेवरच सुरू करणार असल्योचही त्यांनी सांगितले.

Web Title: Madhavrao Mane as President of 'Vasant'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.