घाटंजीत मुहूर्तालाच कापसाला कमी दर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2019 06:00 IST2019-11-23T06:00:00+5:302019-11-23T06:00:12+5:30
शेतकरी जितेंद्र महादेव देठे यांंच्या बैलबंडीचे पूजन करून सभापती अभिषेक ठाकरे यांच्याहस्ते कापूस खरेदी सुरू झाली. यावेळी देठे यांचा शेला, नारळ देऊन सन्मान केला. नंतर कापसाचा लिलाव झाला. यात प्रति क्विंटल चार हजार ८५0 रुपयांचा दर देण्यात आला.

घाटंजीत मुहूर्तालाच कापसाला कमी दर
लोकमत न्यूज नेटवर्क
घाटंजी : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या यार्डात गुरूवारी लिलाव पद्धतीने कापूस खरेदीला प्रारंभ झाला. मात्र मुहूर्तालाच हमी दरापेक्षा कमी दर मिळाल्याने शेतकऱ्यांची निराशा झाली.
शेतकरी जितेंद्र महादेव देठे यांंच्या बैलबंडीचे पूजन करून सभापती अभिषेक ठाकरे यांच्याहस्ते कापूस खरेदी सुरू झाली. यावेळी देठे यांचा शेला, नारळ देऊन सन्मान केला. नंतर कापसाचा लिलाव झाला. यात प्रति क्विंटल चार हजार ८५0 रुपयांचा दर देण्यात आला. यावेळी जिल्हा परिषद सदस्य आशीष लोणकर, नामदेव आडे, भरत पोतराजे, सागर मानकर, संचालक मंडळ, सचिव कपिल चन्नावार, भाऊ देशमुख, सीसीआयचे प्रतिनिधी सुनील अहेर, मोहन रूंगठा, अकबर तंवर, पिंटू अग्रवाल व शेतकरी उपस्थित होते.
शुभारंभानंतर व्यापाऱ्यांनी कापूस खरेदी लिलाव सुरू केला. प्रथम बैलबंडी व नंतर वाहनांतील कपासाचा लिलाव झाला. मात्र हमी दरापेक्षा कमी दराने कापूस खरेदी होत असल्याने शेतकऱ्यांनी संताप व्यक्त करून काही वेळ खरेदी बंद पाडली.
सभापतींनी शेतकरी, व्यापारी व अडते यांची बैठक घेण्याचा प्रयत्न केला. मात्र उपस्थित शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केल्याने सभापती, सचिवांनीच व्यापारी व अडते यांची बैठक घेऊन भावावर तोडगा काढला. त्यानंतर पुन्हा कापूस खरेदी सुरू झाली. मात्र हमीदरापेक्षा कमी भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष खदखदत आहे.