शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

प्रेमातील सुड : हिंजवडीत भावांवर चाकू हल्ला, एक ठार, एक गंभीर; आरोपी यवतमाळमध्ये अटकेत

By सुरेंद्र राऊत | Updated: June 20, 2025 19:25 IST

दोघांवर केले चाकूने वार : अनैतिक संबंधातून घडले हत्याकांड

यवतमाळ : विवाहित महिलेशी अनैतिक संबंध असणाऱ्या युवकाचा तिच्यासोबत वाद झाला. महिलेच्या तक्रारीवरून त्याला कारागृहात जावे लागले. तेथून जामिनावर बाहेर आल्यानंतर सुडाने पेटलेला तो तिच्या शोधात पुण्यातील हिंजवडी येथे पोहोचला. १२ जून रोजी त्याला प्रेयसीचे नातेवाईक मिळाले. त्यांच्याशी वाद झाला. यात त्याने दोघांवर चाकूने सपासप वार केले. यात एक भाऊ गंभीर जखमी झाला तर दुसऱ्याचा उपचारादरम्यान रुग्णालयात मृत्यू झाला. या गुन्ह्यातील आरोपीला यवतमाळ शहर पोलिसांनी शुक्रवारी अटक केली.

निखिल अशोक गेडाम (३०) रा. कुंभारपुरा कळंब चौक असे आरोपीचे नाव आहे. निखिलचे रा. गौरखेडा ता. परतवाडा येथील विवाहित महिलेशी प्रेमसंबंध जुळले. ही महिला पतीला सोडून १० महिने यवतमाळात निखिलसोबत वास्तव्याला होती. नंतर त्या दोघात वाद झाला. महिलेच्या तक्रारीवरून निखिलवर गुन्हा दाखल झाला. त्याला अटक झाली. निखिल बाहेर येताच त्याने तिचा शोध सुरू केला. परतवाडा तालुक्यातील तिच्या मूळगावी निखिलने चौकशी केली. तेव्हा ती व तिचा पती पुणे येथे कामाला असल्याची माहिती मिळाली. तिच्या शोधात निखिल पुण्यातील हिंजवडी परिसरातील गवारे वस्ती येथे पोहोचला. ज्या नातेवाइकाच्या शेजारी महिला व तिचा पती राहत होता.

त्यांच्याकडे निखिलने चौकशी केली. या दरम्यान संतापलेल्या निखिलने अंकज प्रदीप तायडे (२९) याच्या छातीवर चाकूने वार केला. अंकजचा आरडाओरडा ऐकून त्याचाभाऊ पंकज खोलीतून बाहेर आला. त्याच्यावरही निखिलने चाकूने वार केले. पंकजच्या पोटावर चाकू भोसकल्यामुळे आतडे बाहेर आले. आरडाओरडा ऐकून परिसरातील नागरिक गोळा होताच निखिल तेथून पसार झाला. उपचारादरम्यान पंकज प्रदीप तायडे याचा रुग्णालयात मृत्यू झाला. या प्रकरणी अंकजच्या तक्रारीवरून हिंजवडी पोलिसांनी निखिल गेडामविरोधात खुनाचा गुन्हा व खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला.

या घटनेनंतर निखिल यवतमाळात परत आला. त्याच्या शोधात हिंजवडी पोलिस दोन दिवस यवतमाळात मुक्कामी होते. मात्र, निखिलचा सुगावा लागला नाही. त्यामुळे हिंजवडी पोलिसांचे पथक परत गेले. शुक्रवारी यवतमाळ शहर पोलिसांनी निखिलचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेतले. आरोपी मिळाल्याची माहिती हिंजवडी पोलिसांना दिली. त्यांचे पथक आल्यानंतर त्याला ताब्यात दिले जाणार असल्याचे शहर ठाणेदार रामकृष्ण जाधव यांनी सांगितले.

ही कारवाई जमादार रावसाहेब शेंडे, प्रदीप नाईकवाडे, किरण पडघण, अभिषेक वानखडे, पवन नांदेकर, प्रदीप कुरडकर यांनी केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीYavatmalयवतमाळArrestअटक