लोकमत दीपोत्सव ज्ञानाचा प्रकाश शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवते
By Admin | Updated: November 7, 2015 02:32 IST2015-11-07T02:32:59+5:302015-11-07T02:32:59+5:30
दिवाळी म्हणजे प्रकाशाचा सण. दीपांचा प्रकाश या पर्वात शेवटच्या माणसापर्यंत पोहोचतो. तसाच ज्ञानाचा प्रकाश दीपोत्सवाच्या माध्यमातून शेवटच्या माणसापर्यंत ....

लोकमत दीपोत्सव ज्ञानाचा प्रकाश शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवते
राजेश खवले : लोकमत दीपोत्सवाचे शानदार प्रकाशन
यवतमाळ : दिवाळी म्हणजे प्रकाशाचा सण. दीपांचा प्रकाश या पर्वात शेवटच्या माणसापर्यंत पोहोचतो. तसाच ज्ञानाचा प्रकाश दीपोत्सवाच्या माध्यमातून शेवटच्या माणसापर्यंत पोहोचविण्याचे कार्य ‘लोकमत’ करीत असल्याचे प्रतिपादन निवासी उपजिल्हाधिकारी राजेश खवले यांनी केले.
यवतमाळ लोकमत जिल्हा कार्यालयात गुरुवारी आयोजित लोकमत दीपोत्सव प्रकाशन सोहळ्यात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपविभागीय अधिकारी विकास माने, लोकमत जिल्हा कार्यालय प्रमुख किशोर दर्डा, सीए प्रकाश चोपडा, कवी मन्सूर एजाज जोश, उद्घोषिका मंगला माळवे उपस्थित होते. यवतमाळातील साहित्यिक आणि कवींच्या उपस्थितीत झालेल्या या प्रकाशन सोहळ्यात दीपोत्सवाबद्दल मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले.
राजेश खवले म्हणाले, दीपोत्सव हा ज्ञानवर्धक अंंक आहे. त्याने एक लाखांंचा उच्चांक पार केला आहे. अशा या प्रकाशन सोहळ्याला येणे माझे भाग्य समजतो. हा लखपती अंक असून तो करोडोपती व्हावा, अशा शुभेच्छा त्यांनी व्यक्त केल्या.
आपल्या प्रास्ताविकात लोकमत जिल्हा कार्यालय प्रमुख किशोर दर्डा म्हणाले, लोकांच्या विचारांना चालना देणारा हा दीपोत्सव आहे. देशात घडलेल्या घटनांचे चलचित्र या दीपोत्सवात रेखाटले असून दीपोत्सवाचा दैदिप्यमान इतिहास त्यांनी सांगितला. उर्दू कवी मन्सूर एजाज जोश म्हणाले, साहित्य आत्म्याचे खाद्य आहे. साहित्यातून ज्ञानाची तहान भागते. दिवाळी अंकाचा एक भाग होण्याचे भाग्य मलाही काही वर्षापूर्वी लाभले होते. ‘लोकमत’ माणसाला माणूस बनविण्याचे शिक्षण देतो, असे ते म्हणाले. मंगला माळवे यांंनी ‘लोकमत’ दिवाळी अंकाचे त्यांच्याशी असलेले घट्ट नाते उलगडून दाखविले. सातव्या वर्गात असल्यापासून ‘लोकमत’चा दिवाळी अंक वाचत असल्याचे त्यांनी सांगितले. प्रत्येकाच्या उंबरठ्यापर्यंत ज्ञानाचा प्रकाश नेणारा हा दीपोत्सव असल्याचे त्यांंनी सांगितले.
सीए प्रकाश चोपडा यांनी लोकमतचे एडिटर इन चिफ राजेंद्र दर्डा यांचा मराठवाड्यातील एका गावातील अनुभव सांगितला. एका गावात राजेंद्र दर्डा यांनी एका व्यक्तीला तुमच्या घरी कोण कोण राहते, असे विचारले. तेव्हा त्या व्यक्तीने मी, माझी पत्नी, माझा मुलगा आणि माझा लोकमत असे सांगितले. ‘लोकमत’हा महाराष्ट्रातील प्रत्येक कुटुंबाचा कसा सदस्य झाला हे यातून दिसून येते. प्रत्येकाने वाचावा असा अंक असल्याचे चोपडा म्हणाले.
कार्यक्रमाला प्राचार्य शंकरराव सांगळे, माणिकराव भोयर, कवी हेमंत कांबळे, साहित्यिक योगानंद टेभूर्णे, संजय शिंदे पाटील, मोहन गांधी, नरेश लुणावत, सुभाष जैन, अशोक जैन यांच्यासह लोकमत परिवारातील सदस्य उपस्थित होते. संचालन काशीनाथ लाहोरे यांंनी तर आभार लोकमत टाइम्सचे जिल्हा प्रतिनिधी रणजितसिंह चंदेल यांनी मानले. (नगर प्रतिनिधी)