निराधाराच्या मानधनातून कर्जकपात

By Admin | Updated: October 29, 2016 00:16 IST2016-10-29T00:16:33+5:302016-10-29T00:16:33+5:30

नेर तालुक्यातील चिखली-कान्होबा येथील ७६ वर्षीय आजारानेग्रस्त वृद्ध चातकासारखी संजय गांधी निराधार योजनेच्या मानधनाची प्रतीक्षा करीत आहे.

Loan from debt of funding | निराधाराच्या मानधनातून कर्जकपात

निराधाराच्या मानधनातून कर्जकपात

महिनाभरात ४६ हजार पोत्यांची आवक : नाफेडची खरेदी सुरू
नरेंद्र जावरे परतवाडा
कालपर्यंत बेभाव विक्री होत असलेल्या सोयाबीनला दोन दिवसांपासून चांगले दर मिळू लागले आहे, तर मिरची किलोमागे ३० रुपयांनी घसरली आहे. त्यामुळे सोयाबीनने हसवले तर मिरचीने शेतकऱ्यांना रडविले आहे. गुरुवारी येथील बाजार समितीच्या शेतकरी भवनात नाफेडतर्फे सोयाबीन खरेदीचा शुभारंभ झाला.
अचलपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अजय टवलारकर नाफेडचे मार्केटिंग अधिकारी अशोक देशमुख बाजार समितीचे संचालक साहेबराव कोठाळे, मनोहर जाधव, दिलीप पाटील शेळके, बाबुलाल पंधरे, सुधीर रहाटे, प्रकाश पवित्रकार, व्यापारी रमेश व्यास, शेतकरी मोहन वानखडे, मंगेश हुड, पोपट घोडेराव, सचिव मंगेश भेटाळू आदी उपस्थित होते.
महिन्यभरात ४६ हजार क्विंटल
दिवाळी सणामुळे अचलपूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांनी हजारो क्विंटल धान्य विकायला आणले. आॅक्टोबर महिन्यात ४६ हजार क्विंटल सोयाबीनची आवक झाली असून दोन हजार सातशे ते दोन हजार नऊशे रुपयांनी चांगल्या सोयाबीनची खरेदी झाली. सहा हजार क्विंटल तुरीची आवक झाली. सहा हजार दोनशे ते सहा हजार आठशे रुपये क्विंटलने उडीद नऊशे पोते आवक झाली. चार हजार ते सात हजार पाचशे रुपयापर्यंतची खरेदी झाली.
नाफेडचा दर सत्ताविसशे पन्नास रुपये
नाफेडतर्फे तब्बल महिनाभर उशिरा सोयाबीन खरेदीचा शुभारंभ गुरुवारी बाजार समितीत झाला. पहिल्याच दिवशी व्यापाऱ्यांच्या तुलनेत २७०५० रुपये दर कमी ठरला. कुठल्याच प्रकारची कट्टी नसल्याने शेतकऱ्यांना त्याचा लाभ झाला. कालपर्यंत व्यापाऱ्यांची सुरू असलेल्या मनमर्जी दराला नाफेडमुळे चाफ बसणार आहे.
वाळलेल्या लाल मिरचीचे दर किलोमागे ३० रुपये कमी झाल्याने मिरची बाजारात शेतकऱ्याची निराशा झाली. शेतकऱ्यांना गुरुवारी ८० ते ८५ रुपये किलो दराने मिरची विकावी लागली. मागील आठवड्यात याच लाल मिरचीचे दर ११० रुपये प्रति किलो होते. येथील मिरची नागपूर बाजारात मोठ्या प्रमाणात व्यापारी विक्रीला नेतात. गुरुवारी जवळपास तिनशे क्विंटल मिरचीची आवक झाली. दिवाळीच्या ऐन तोंडावर मिरची विकायला आणल्यावर किलोमागे वीस रुपये मोठी रक्कम असल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाल्याचे धामणगाव गढी येथील शेतकरी उमेशराव फाटकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

Web Title: Loan from debt of funding

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.