पांढरकवडा चेकपोस्ट दरोड्यासह गंभीर गुन्ह्यांतील ऐवज सुपूर्द

By Admin | Updated: January 7, 2015 23:00 IST2015-01-07T23:00:17+5:302015-01-07T23:00:17+5:30

पांढरकवडा येथील बहुचर्चित दरोड्यासह जिल्ह्यातील विविध ठिकाणी झालेल्या जबरी चोऱ्या, घरफोडीच्या घटनांचा छडा लावून पोलिसांनी सुमारे दहा लाख ५४ हजार रुपयांचा ऐवज जप्त केला.

Liquid transfer of cash in cash with checkpost dacoity | पांढरकवडा चेकपोस्ट दरोड्यासह गंभीर गुन्ह्यांतील ऐवज सुपूर्द

पांढरकवडा चेकपोस्ट दरोड्यासह गंभीर गुन्ह्यांतील ऐवज सुपूर्द

यवतमाळ : पांढरकवडा येथील बहुचर्चित दरोड्यासह जिल्ह्यातील विविध ठिकाणी झालेल्या जबरी चोऱ्या, घरफोडीच्या घटनांचा छडा लावून पोलिसांनी सुमारे दहा लाख ५४ हजार रुपयांचा ऐवज जप्त केला. त्यामध्ये रोख, सोन्या-चांदीच्या दागिन्यांचा समावेश आहे. जप्तीतील या ऐवजाचे रायझिंग डे सप्ताहानिमित्त येथील पोलीस मुख्यालयाच्या सभागृहात एक कार्यक्रम घेवून जिल्हा पोलीस अधीक्षक संजय दराडे यांच्या हस्ते वितरण करण्यात आले.
पाटणबोरी येथील चेकपोस्टमधून दैनंदिन वसुलीतून आलेली पाच लाख ६१ हजाराची रोकड भरणा करण्यासाठी निघालेल्या एका कर्मचाऱ्याला मारहाण करून रोकड लुटून नेण्यात आली होती. पांढरकवडा पोलिसांनी या घटनेचा छडा लावून त्यातील तीन लाख ४६ हजार ९५० रुपयांची रोकड जप्त केली. न्यायालयाच्या आदेशावरून ही रक्कम फिर्यादी प्रमोद रेंगे यांना कार्यक्रमात जिल्हा पोलीस अधीक्षक संजय दराडे यांनी दिली. त्याचप्रमाणे वडकी पोलीस ठाण्याच्या हद्दीत पिंपळापूर येथे घरफोडीत ३६ हजार ६४० रुपयांचे सोन्याचे दागिने चोरीस गेले होते. ते रेखा तोडासे यांना देण्यात आले. दारव्हा ठाण्याच्या हद्दीतील घरफोडीत ३० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरीस गेले होते. ते मोहन राठोड रा.चिखली यांना देण्यात आले. आर्णी येथील संजय गड्डमवार यांच्याकडील घरफोडीत ४० ग्रॅम सोने आणि २० ग्रॅम चांदी लंपास झाली होती. त्याचप्रमाणे आर्णी येथीलच प्रशांत कर्णेवार यांच्याकडील घरफोडीत २०० ग्रॅम चांदी, संतोष गोफणे यांच्याकडील ५२ ग्रॅम सोने, पोखरी येथील राम सगरूळे यांचे १३ हजार ५०० रुपये किमतीचे सोन्याचे दागिनेही यावेळी परत करण्यात आले. उमरखेड येथील संतोष श्रीरामजवार यांनी कारागिराला दिलेले तीन लाख १३ हजार ५०० रुपये किमतीचे ११० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आणि पुरुषोत्तम निमोदिया यांचा ५०३ ग्रॅम चांदीचा ऐवज त्यांना परत मिळाला.
यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने, परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक शीतल दानवे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजय पुज्जलवार, शहर ठाणेदार दिलीप चव्हाण, वाणी उपस्थित होते. (स्थानिक प्रतिनिधी)

Web Title: Liquid transfer of cash in cash with checkpost dacoity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.