शहरं
Join us  
Trending Stories
1
फक्त मराठीच अनिवार्य, हिंदी सक्तीवर सरकारचे एक पाऊल मागे; नवीन आदेश काढणार
2
'हा' अमित मिश्रा वेगळा... कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप झालेला क्रिकेटर नेमका कोण? जाणून घ्या...
3
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना
4
मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्रासारखाच दर्जा; मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय
5
बँकेने गुन्हा दाखल केल्याने त्याची सटकली, साथीदारांना सोबत घेत अख्खी बँकच पेटवली
6
UPSC पास झाल्यानंतर उमेदवारांना पहिला पगार कधी आणि किती मिळतो? पाहा...
7
"मुस्लीम राजेशाही असो अथवा लोकशाही, वक्फ सर्वत्र...;" सौदीत पोहोचलेल्या PM मोदींवर ओवेसींचा निशाणा
8
Jammu and Kashmir : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये मोठा दहशतवादी हल्ला; पर्यटकांवर केला गोळीबार, २ जण जखमी
9
Jammu and Kashmir : दहशतवाद्यांनी पर्यटकांना आधी विचारला 'हा' प्रश्न अन् सुरू केला गोळीबार, नेमकं काय घडलं?
10
दहशतवाद्यांनी आधी धर्म विचारला, नंतर झाडल्या गोळ्या, पहलगाम हल्ल्यातील जखमींचा धक्कादायक दावा   
11
'नरेंद्र मोदी जगातील सर्वात लोकप्रिय नेते', जेडी व्हेन्स यांनी केले पंतप्रधानांचे कौतुक...
12
IPL 2025: हर्षा भोगलेंना KKRच्या मॅचमधून मुद्दाम वगळलं? खुद्द त्यांनीच दिलं स्पष्टीकरण
13
तेव्हा सलग १७ वर्षे घटत होते सोन्याचे दर, झालं होतं एवढं स्वस्त, मात्र आता...  
14
जालना: बॉयफ्रेंडकडून बदनामीच्या धमक्या, १८ वर्षीय तरुणीने संपवलं आयुष्य, मृतदेह कुठे सापडला?
15
टेबल फॅन खूपच खराब झालाय? स्वच्छ करण्यासाठी पाहा 'ही' सोपी पद्धत, पंखा दिसेल नव्यासारखा
16
नरेंद्र मोदींचं विमान सौदी अरेबियाच्या हवाई हद्दीत प्रवेश करताच घडलं असं काही, सारेच अवाक्
17
सलग सहाव्या दिवशी बाजार तेजीत बंद; 'या' बँकांच्या शेअर्सने खाल्ला भाव; कोणत्या सेक्टरमध्ये घसरण?
18
बापरे! सासू अन् जावयानंतर आता विवाहित महिला १५ वर्षाच्या मुलासोबत फरार, प्रकरण काय?
19
सोन्यानं पार केला १ लाखांचा टप्पा, शक्ती कपूरनं ३५ वर्षांपूर्वीच केलेली भविष्यवाणी; व्हिडीओ व्हायरल
20
'२३७ जागा मिळल्याचा माज करू नका, शिंदेंमुळे त्या मिळाल्या', शिवसेना आमदार कदमांचा अतुल सावेंवर पलटवार

राज्यातील सर्व अंगणवाड्या शाळांशी होणार ‘लिंक’

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2021 03:10 IST

नवे शैक्षणिक धोरण : शिक्षण-महिला बालकल्याण विभागात समन्वयाचे प्रयत्न

अविनाश साबापुरेलोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात पूर्वप्राथमिक शिक्षणावर भर देण्यात आला आहे. या धोरणाची आता महाराष्ट्रात अंमलबजावणी सुरू झाली असून, पूर्वप्राथमिक स्तरावर विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी सर्व अंगणवाड्या प्राथमिक शाळांसोबत ‘लिंक’ करण्यात येणार आहेत. त्यासाठी शालेय शिक्षण सचिव वंदना कृष्णा यांनी सात दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे.

राज्यात सध्या एक लाख आठ हजार पाच अंगणवाडी केंद्रे आहेत. तेथे चार हजार पर्यवेक्षक आणि दोन लाख अंगणवाडी सेविका व मदतनीस कार्यरत आहेत, तर एक लाख दहा हजार इतकी शाळांची संख्या आहे. यातील बहुतांश अंगणवाड्या या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांच्या परिसरात आहेत. मात्र प्राथमिक शाळा शिक्षण विभागाच्या तर अंगणवाड्या महिला व बालविकास विभागाच्या अखत्यारित येतात. आता अंगणवाडी व शाळेचे एकत्रीकरण करताना या दोन्ही विभागांनी एकमेकांशी समन्वय ठेवणे आवश्यक झाले आहे. त्यामुळेच राज्याच्या शिक्षण सचिवांनी सोमवारी सर्व जिल्हा परिषदांना लेखी आदेश बजावून या दोन विभागांची समन्वय बैठक घेण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच सात दिवसात जिल्ह्यातील सर्व अंगणवाड्या केंद्र शाळांशी जोडून त्याबाबतचा अहवाल मागविला आहे.

दोन विभागांच्या आकडेवारीत तफावतशिक्षण विभागाने यूडायस प्रणालीत संकलित केलेल्या आकडेवारीनुसार, ४३ हजार अंगणवाड्या या प्राथमिक शाळांच्या प्रांगणातच (को-लोकेटेड) आहेत. परंतु, एकात्मिक बालविकास आयुक्तालयाच्या आकडेवारीनुसार, अशा अंगणवाड्यांची संख्या केवळ सहा हजार आहे. या दोन्ही विभागांच्या आकडेवारीत प्रचंड तफावत आहे.

‘लिंकिंग’नंतर काय होणार?शाळा आणि अंगणवाडी केंद्र परस्परांशी जोडल्यानंतर अंगणवाडी सेविकांना प्राथमिक शिक्षकांप्रमाणे सेवांतर्गत प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यांना पूरक अध्यापन-अध्ययन साहित्य पुरविले जाणार आहे. ‘आकार’ अभ्यासक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी मार्गदर्शन केले जाणार आहे. समग्र शिक्षा अभियानातील विविध योजना अंगणवाडी केंद्रालाही लागू केल्या जातील.

एकत्रीकरण कशासाठी?३ ते ६ वर्षे वयोगटातील मुलांना अंगणवाडीत पूर्वप्राथमिक शिक्षण दिले जाते. ६ वर्षे पूर्ण झाल्यावर ही मुले प्राथमिक शाळेत जातात. मात्र अंगणवाडीत ही मुले शैक्षणिकदृष्ट्या परिपूर्ण झालेली नसल्याने प्राथमिक शिक्षणातही मागे पडतात. त्यामुळे प्राथमिक शाळा आणि अंगणवाडी केंद्र यांनी एकत्र आणून दर्जेदार पूर्वप्राथमिक शिक्षण दिले जाणार आहे.

 

टॅग्स :Yavatmalयवतमाळanganewadi jatraआंगणेवाडीSchoolशाळा