शहराच्या स्वच्छतेसाठी चिमुकले सरसावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2019 05:00 IST2019-12-23T05:00:00+5:302019-12-23T05:00:45+5:30

नगरपरिषद प्रशासन केवळ कागदोपत्रीच स्वच्छता अभियान राबविते. परिणामी गावात ठिकठिकाणी कचºयाचे ढिगारे साचले आहे. प्रशासनसोबतच नागरिकही स्वच्छतेबाबत उदासीन दिसून येत आहे. त्यामुळे आता शहरातील आठवीच्या विद्यार्थ्यांनी ‘पर्यावरण मित्र’ नावाचा समूह तयार केला. या समूहातील विद्यार्थी प्रत्येक रविवारी चौकाचौकात धडकून कचऱ्याचे ढिगारे पालिकेच्या कचरा कुंडीत भरताना दिसत आहे.

The limelight was cleaned up for the cleanliness of the city | शहराच्या स्वच्छतेसाठी चिमुकले सरसावले

शहराच्या स्वच्छतेसाठी चिमुकले सरसावले

ठळक मुद्देआर्णीत उपक्रम : दर रविवारी अभियान, नागरिकांकडून कौतुक

लोकमत न्यूज नेटवर्क
आर्णी : ठिकठिकाणी साचलेल्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यांमुळे आपल्या गावाची प्रतिष्ठा धुळीस मिळते. त्यामुळे आता प्रशासनाच्या भरवशावर न राहता आपणच आपल्या परिसराची स्वच्छता करून आपले शहर स्वच्छ ठेवण्याचा विडा शहरातील पर्यावरण मित्र असलेल्या चिमुकल्यांनी उचलला आहे.
नगरपरिषद प्रशासन केवळ कागदोपत्रीच स्वच्छता अभियान राबविते. परिणामी गावात ठिकठिकाणी कचºयाचे ढिगारे साचले आहे. प्रशासनसोबतच नागरिकही स्वच्छतेबाबत उदासीन दिसून येत आहे. त्यामुळे आता शहरातील आठवीच्या विद्यार्थ्यांनी ‘पर्यावरण मित्र’ नावाचा समूह तयार केला. या समूहातील विद्यार्थी प्रत्येक रविवारी चौकाचौकात धडकून कचऱ्याचे ढिगारे पालिकेच्या कचरा कुंडीत भरताना दिसत आहे.
संबंधित परिसरातील सर्व दुकानदारांना कचरा रस्त्यावर न टाकता कचरा कुंडीत टाकण्याची विनंती करीत आहे. आपला देश स्वच्छ करायचा असेल, तर सुरुवात स्वत:पासून व गावापासून करावी, लागेल असा संदेशही ते दुकनदारांना आवर्जून देतात. केवळ सोशल मीडियावर स्वच्छता मोहीम राबविणाºयांना चपराक लगावून या चिमुकल्यांनी त्यांच्यासमोर आदर्श उभा केला आहे.
खुल्या हाताने कचरा वेचणाºया या चिमुकल्यांना आसिफ चव्हाण यांनी हात मोजे उपलब्ध करून दिले. गणेश हिरोळे, इरफान रजा आदींनी त्यांचे कौतुक करून सहकार्य केले. या चिमुकल्यांच्या उपक्रमात सर्व पर्यावरण प्रेमींनी सहभागी व्हावे, अशी सर्वांनाच अपेक्षा आहे.

‘मूर्ती लहान, पण कीर्ती महान’चा प्रत्यय
शहरातील स्वच्छतेसाठी पुढे सरसावलेली ही वानर सेना आहे. मूर्ती लहान, पण कीर्ती महान, अशी प्रचिती त्यांनी आणून दिली आहे. येथील म.द.भारती विद्यालयातील आठवीतील सक्षम ढाकुलकर, क्रीश राऊत, कृष्णा डवले, सोहम हरसूलकर, हृषीकेश गुटे, सिद्धांत चौधरी, वेदांत पद्मावार, आयुष दुल्लरवार, तिलक कुशवाह आदी चिमुकले या उपक्रमात सहभागी झाले आहेत. त्यांचे शहरात सर्वत्र कौतुक होत आहे.

Web Title: The limelight was cleaned up for the cleanliness of the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.