Lightning kills six in Yavatmal district | यवतमाळ जिल्ह्यात वीज कोसळून सहा ठार

यवतमाळ जिल्ह्यात वीज कोसळून सहा ठार

ठळक मुद्देमृतांमध्ये दोन दाम्पत्यराळेगाव तालुक्यातील घटना

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ: राळेगाव तालुक्यातील गुजरी नागठाणा-शिवारात रविवारी सायंकाळी 7:30 वाजताच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली. यावेळी नागठाणा येथील गोंडे यांच्या शेतात टीनपत्रात राहणाऱ्या एका घरावर वीज कोसळली. त्यात सहा जणांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये दोन दांपत्याचा समावेश आहे.
अभिमान आंबाघरे 60, मंदाबाई अभिमान आंबाघरे 50 आणि साहेबराव देवतळे 45 व पीसबाई साहेबराव देवतळे 40 अशी ठार झालेल्या दोन दाम्पत्याची नावे आहे. याशिवाय लक्ष्मण बापूराव कोहळे 50 आणि सुभाष राजू नेहारे 20 हे दोघे ठार झाले. अभिमान आंबाघरे व मंदाबाई आंबाघरे व लक्ष्मण कोहळे आणि सुभाष नेहारे हे निमगव्हाण ता. कळंब जि. यवतमाळ येथील रहिवाशी आहे. तर देवतळे कुटुंब कोडपाखिंडी येथील रहिवासी आहे. सोमवारी सकाळी शेतमालक अरुण गोंडे शेतात गेल्यानंतर ही घटना उघडकीस आली. त्यांनी लगेच राळेगाव पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा सुरू केला. वृत्तलिहेस्तोवर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आले नव्हते.

Web Title: Lightning kills six in Yavatmal district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.