अत्याचार करणाऱ्या नराधमाला फाशी द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2018 22:24 IST2018-09-22T22:18:19+5:302018-09-22T22:24:42+5:30
बुलडाणा जिल्ह्याच्या संग्रामपूर तालुक्यातील वानखेड येथील मतिमंद मुलीवर झालेल्या बलात्कार प्रकरणाचा खटला जलदगती न्यायालयात चालवून आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी दारव्हा तालुका बारी समाज संघटनेने .....

अत्याचार करणाऱ्या नराधमाला फाशी द्या
लोकमत न्यूज नेटवर्क
दारव्हा : बुलडाणा जिल्ह्याच्या संग्रामपूर तालुक्यातील वानखेड येथील मतिमंद मुलीवर झालेल्या बलात्कार प्रकरणाचा खटला जलदगती न्यायालयात चालवून आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी दारव्हा तालुका बारी समाज संघटनेने उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे.
वानखेड येथे समाजातील मतिमंद मुलीवर गावातील प्रकाश लोणे या नराधमाने घरात शिरून अतिप्रसंग केला. या प्रकरणातील आरोपीला पोलिसांनी तत्काळ अटक केली. मात्र प्रकरण अतिशय गंभीर असून पीडित मुलगी ही मतिमंद असल्यामुळे तिला त्वरित न्याय मिळणे गरजेचे आहे. त्यामुळे या प्रकरणाचा खटला जलद गती न्यायालयात चालविण्यात यावा, या खटल्यासाठी विशेष सरकारी वकील म्हणून उज्वल निकम यांची नियुक्ती करावी, अशी समाजाची मागणी आहे.
अशा नीच प्रवृत्तीचा समूळ नाश होण्यासाठी नराधम प्रकाश लोणे याला फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. निवेदन देताना तालुक्यातील बारी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान, शनिवारी प्रकाशित ‘शेतकºयांना १२ तास वीज द्या, काँग्रेसची मागणी-एसडीओंना निवेदन’ या वृत्तात अनावधानाने बारी समाज संघटनेने एसडीओंना दिलेल्या निवेदनाचे छायाचित्र प्रकाशित झाले. या छायाचित्रामुळे काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्त्यांना नाहक त्रास झाल्याबद्दल दिलगीर आहोत.