बिबट्याच्या हल्ल्यात गोठ्यातील बैल ठार

By Admin | Updated: May 9, 2016 02:25 IST2016-05-09T02:25:36+5:302016-05-09T02:25:36+5:30

शेतातील गोठ्यात बांधून असलेल्या दोन बैलांवर बिबट्याने हल्ला करून जागीच ठार मारल्याची घटना नेर तालुक्यातील सोनखास हेटी येथे रविवारी सकाळी उघडकीस आली.

In the leopard attack killed the bull in the stable | बिबट्याच्या हल्ल्यात गोठ्यातील बैल ठार

बिबट्याच्या हल्ल्यात गोठ्यातील बैल ठार

सोनखासची घटना : शेतकऱ्यांत भीती
सोनखास : शेतातील गोठ्यात बांधून असलेल्या दोन बैलांवर बिबट्याने हल्ला करून जागीच ठार मारल्याची घटना नेर तालुक्यातील सोनखास हेटी येथे रविवारी सकाळी उघडकीस आली.
सोनखास येथील सतीश बाबाराव झामरे यांचे गावापासून एक किलोमीटर अंतरावर शेत आहे. या शेतात असलेल्या गोठ्यात नेहमीप्रमाणे त्यांनी आपले दोनही बैल शनिवारी रात्री बांधून ठेवले होते. रविवारी सकाळी शेतात गेले असता दोनही बैल मृतावस्थेत आढळून आले. या जनावरांवर हिंस्त्र प्राण्याने हल्ला केल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले. त्यामुळे वन विभागाला या घटनेची माहिती देण्यात आली. वन क्षेत्र सहायक टी.एन. फुनसे, वनरक्षक आर.एम. खताडे, एन.एम. बिजेवाड यांनी घटनास्थळ गाठले. परिसराची पाहणी केली असता बिबट्याच्या पावलाचे ठसे गोठ्याच्या आसपास दिसून आले. त्यामुळे या बैलांवर बिबट्याने हल्ला केल्याचे पुढे आले. यानंतर नेर येथील पशुवैद्यकीय अधिकारी इसळकर यांनी शवविच्छेदन केले. या घटनेने शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले असून हिंस्त्र प्राण्यांच्या बंदोबस्तासोबतच शेतकऱ्याला नुकसानभरपाई देण्याची मागणी आहे. (वार्ताहर)

Web Title: In the leopard attack killed the bull in the stable

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.