शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेच्या ४८ जागांपैकी आम्ही..."; काँग्रेसचा मोठा दावा, विजयी आकडाच सांगितला
2
JP Nadda : "केजरीवालांचा पर्दाफाश, महिलांच्या अपमानावर गप्प का?"; जेपी नड्डा यांचं जोरदार प्रत्युत्तर
3
नरेंद्र मोदींच्या 'रोड शो' साठी मुंबई महापालिकेचा पैसा वापरला; संजय राऊतांचा आरोप
4
बाळासाहेबांच्या खोलीतील कधीही न ऐकलेला गौप्यस्फोट; देवेंद्र फडणवीस म्हणाले...
5
मुंबई इंडियन्स शेवटची मॅचही हरली! हार्दिक पांड्याने सगळे खापर टीमवर फोडले, म्हणतोय...
6
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजात तेजी, Nestle च्या शेअर्समध्ये तेजी, JSW घसरला
7
६० नातेवाईक मिळून देवदर्शनाला गेलेले, बसला पहाटे भीषण आग, ८ जणांचा मृत्यू, २४ गंभीर
8
चिमुकल्याचा मृतदेह, रहस्यमय चिठ्ठी अन् 'ते' ७ शब्द; तांत्रिकाच्या मदतीनं अघोरी डाव?
9
किर्गिस्तानमध्ये स्थानिकांचा भारतीय, पाकिस्तानी विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार; तीन विद्यार्थ्यांची हत्या
10
Infosys नं वाढवली ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची संपत्ती; पत्नीनंही केली मोठी कमाई, जाणून घ्या
11
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
12
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
13
सोढीने केला संसार त्याग?; 25 दिवसानंतर गुरुचरण सिंगची घरवापसी, दिली पहिली प्रतिक्रिया
14
आजचे राशीभविष्य १८ मे २०२४; जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठी चांगला दिवस
15
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
16
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
17
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी
18
अतिरेकी हल्ल्यातील शहिदांचा अपमान करणाऱ्यांना जागा दाखवा: देवेंद्र फडणवीस
19
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार, त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या अपेक्षा: राज ठाकरे 
20
हीच भटकती आत्मा तुम्हाला सत्तेबाहेर बसवेल हे नक्की; शरद पवारांची सडकून टीका

नेर येथे अतिक्रमणधारकांना लीजपट्टे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2018 10:32 PM

शहरी भागातील अतिक्रमणधारकांना लीजपट्टे वाटपाची सुरुवात नेर येथून करण्यात आली आहे. पूर्वी केवळ ग्रामीण भागातील अतिक्रमणधारकांनाच लिजपट्टे दिले जात होते. महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी चौदा वर्षांपूर्वी दिलेल्या आश्वासनाची पूर्तता येथील अशोकनगरातील १२ जणांना प्रमाणपत्राचे वाटप करून करण्यात आली आहे.

ठळक मुद्देबारा जणांना प्रमाणपत्र : महसूल राज्यमंत्र्यांचे प्रयत्न, चौदा वर्षांच्या आश्वासनांची पूर्ती

लोकमत न्यूज नेटवर्कनेर : शहरी भागातील अतिक्रमणधारकांना लीजपट्टे वाटपाची सुरुवात नेर येथून करण्यात आली आहे. पूर्वी केवळ ग्रामीण भागातील अतिक्रमणधारकांनाच लिजपट्टे दिले जात होते. महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी चौदा वर्षांपूर्वी दिलेल्या आश्वासनाची पूर्तता येथील अशोकनगरातील १२ जणांना प्रमाणपत्राचे वाटप करून करण्यात आली आहे. शहरी भागातील अतिक्रमणधारकांना लिजपट्टे वाटपाचा हा ऐतिहासिक निर्णय मानला जाता आहे.येथील अशोकनगरात ना. संजय राठोड यांच्या हस्ते १२ जणांना प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. अध्यक्षस्थानी परमानंद अग्रवाल होते. प्रमुख पाहुणे म्हणून नगराध्यक्ष वनिता मिसळे, नगरपरिषद उपाध्यक्ष पवन जयस्वाल, शिवसेना जिल्हा प्रमुख पराग पिंगळे, बाबू पाटील जैत , दारव्हा उपविभागीय अधिकारी जयंत देशपांडे, तहसीलदार अमोल पोवार, मुख्याधिकारी नीलेश जाधव, गटविकास अधिकारी युवराज मेहत्रे, शिवसेना तालुका प्रमुख मनोज नाल्हे, शहर प्रमुख दीपक आडे, नगरसेवक शालिक गुल्हाने, नामदेव खोब्रागडेआदी उपस्थित होते. महसूल विभागाच्यावतीने हा कार्यक्रम घेण्यात आला.यावेळी ना. संजय राठोड म्हणाले, २००४ साली मी अशोकनगरवासियांना मालकी हक्काचे लिजपट्टे देण्याचे आश्वासन दिले होते. मुख्यमंत्र्यांशी चार वेळा बैठका लावून लिजपट्याचा विषय मार्गी लावला. मतदार संघाच्या विकासासाठी मी तत्पर आहे. अशेकनगरवासियांनी कराचा भरणा करून प्रमाणपत्र उपलब्ध करून घ्यावे.उपस्थित मान्यवरांनी समयोचित विचार मांडले. संचालन बंडू बोरकर, प्रास्ताविक नायब तहसीलदार राजेद्र चिंतकुटलावार यांनी केले. यावेळी माया राणे, रुपाली दहेलकर, वंदना मिसळे, विनोद जयसिंगपुरे, गजानन दहेलकर, रश्मी पेठकर, मजरखॉ पठाण आदिंनी उपस्थिती होती. यशस्वीतेसाठी सागर गुल्हाने, प्रमोद वासनिक, प्रशांत वगारे, धारेराव जावतकर, श्याम इंगळे, सुभाष मेश्राम आदींनी पुढाकार घेतला.

टॅग्स :Enchroachmentअतिक्रमण