पाहुण्या महिलेचे दीड लाखाचे दागिने लंपास
By Admin | Updated: June 2, 2017 01:40 IST2017-06-02T01:40:36+5:302017-06-02T01:40:36+5:30
लग्नासाठी काकाच्या घरी पाहुणी म्हणून आलेल्या नांदेड येथील महिलेचे सोन्याचे दागिने पर्समधून चोरीस गेले.

पाहुण्या महिलेचे दीड लाखाचे दागिने लंपास
नांदेडची महिला : यवतमाळातील घटना
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : लग्नासाठी काकाच्या घरी पाहुणी म्हणून आलेल्या नांदेड येथील महिलेचे सोन्याचे दागिने पर्समधून चोरीस गेले. ही घटना येथील विदर्भ हाऊसिंग सोसायटीत घडली.
दीपांकुर सकवान (२५) रा.गीतानगर, नांदेड असे दागिने चोरीस गेलेल्या महिलेचे नाव आहे. ती मोठ्या भावाच्या लग्नासाठी काका किशोर मांडन यांच्याकडे आली होती. २२ मे रोजी सकाळी अंघोळ करून तयारी करीत होती. दागिने घालण्यासाठी कपाटातील पर्स उघडून बघितली असता दागिने लंपास झाल्याचे लक्षात आले. पर्समधील ५९ ग्रॅम सोन्याची पोत, कानातील वेल चार ग्रॅम, टॉप्स सहा ग्रॅम असे ६९ ग्रॅम सोन्याचे दागिने किमत एक लाख ४० हजार रुपये अज्ञात चोरट्याने लंपास केले. या घटनेची वडगाव रोड तक्रार देण्यात आली. पोलिसांनी अज्ञाताविरूद्ध गुन्हा नोंद केला आहे.