कडूनिंबाच्या झाडांवरही अळीचे आक्रमण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2017 22:59 IST2017-11-19T22:58:48+5:302017-11-19T22:59:00+5:30
सध्या बोंड अळीने कपाशीवर आक्रमण केले आहे. कपाशीच्या बोंडाच्या आतील भागात शिरून गुलाबी बोंड अळी बोंडे नष्ट करीत आहे.

कडूनिंबाच्या झाडांवरही अळीचे आक्रमण
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेपेरा : सध्या बोंड अळीने कपाशीवर आक्रमण केले आहे. कपाशीच्या बोंडाच्या आतील भागात शिरून गुलाबी बोंड अळी बोंडे नष्ट करीत आहे. तर विषबाधेच्या प्रकरणामुळे कृषी केंद्रचालकांनी किटकनाशके विकणे बंद केले आहे. त्यामुळे शेतकºयांनी घरगुती उपाय म्हणून कडूनिंबाच्या पानाला उकडून निंबोळी अर्क तयार करतात. हा अर्क तूर, कपाशीवर फवारल्यास कीडीवर नियंत्रण येते. मात्र आता कडूनिंबाच्या झाडावरही अळीने आक्रमण केले आहे.
या कडूनिंबाच्या पानाचा रस काढून फवारणी केल्यास बीटीच्या बियाणावर अळी येत नसल्याचा दावा कृषी तज्ज्ञांनी केला आहे. मात्र सध्या कडूनिंबाच्या झाडावरच अळीने आक्रमण केले असून संपूर्ण पानेसुद्धा नष्ट केली आहे. एकीकडे कृषी विभागातील सहाय्यकापासून तर अधिकाºयापर्यंत विषबाधा प्रकरण व बोंडअळी यावर नियंत्रण कसे आणायचे, याकरिता नानाविध प्रयोग करताना दिसत आहे. तर दुसरकडे अळी कमी होण्याऐवजी उलट वाढतच चालली आहे. त्यामुळे भविष्यात कडूनिंबाच्या झाडाला पाने राहतील की नाही, याबाबत शंका आहे.