शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्ही तर रक्ताचे होतात, मग का असं केलं?; छगन भुजबळांचा राज ठाकरेंवर पलटवार
2
मोदी जे बोलतात, त्यातलं १ टक्काही खरं नाही, त्यांचा आत्मविश्वास ढळलाय"; शरद पवारांची टीका
3
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
4
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
5
'भाजपचे सरकार कायम राहणार नाही, आज ना उद्या नक्की बदला घेईन', ममता बॅनर्जींचा इशारा
6
हैदराबादमध्ये पावसाचं थैमान! SRH vs GT सामना रद्द झाल्यास संपुष्टात येईल RCB चं आव्हान?
7
स्वत: फुटबॉलपटू असलेली आईच बनली लेकाची कोच आणि म्हणून.. सुनील छेत्रीच्या फुटबॉलप्रेमाची खास गोष्ट!
8
मुलगी हरवल्याप्रकरणी चौकशीसाठी नेलं अन् कोठडीतच तरूणाचा मृत्यू, नेमकं काय झालं?
9
"मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, गोहत्या करणाऱ्यांना उलटे लटकवून सरळ करू", अमित शाहांचा इशारा
10
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
11
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान
12
"यासारखी अमानुष गोष्ट नाही..."; पंतप्रधान मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून संजय राऊतांचा हल्लाबोल
13
‘मी त्यांच्यासोबत, जर स्वाती मालिवाल यांना वाटलं तर…’ गैरवर्तन प्रकरणी प्रियंका गांधी यांचं मोठं विधान 
14
विकी कौशलची 'ही' इच्छा अजूनही अपूर्णच! म्हणाला, 'कधी करेन माहित नाही पण...'
15
Hina Khan : "40 डिग्रीत वेदनादायक पीरियड क्रॅम्प्सने त्रस्त असताना..."; हिना खानने सांगितला अनुभव
16
आमनेसामने Video: ठाकरे गटाकडून 50 खोकेची घोषणाबाजी; एकनाथ शिंदेंकडून धनुष्यबाणाचा इशारा
17
‘पृथ्वीराज चव्हाण यांनी पोपट घेऊन भविष्यवाणी सांगण्यास बसावे’, अजित पवार गटाचा टोला 
18
‘मोदींनी एकदा मला फोन केला आणि म्हणाले, माझा अमेरिकेचा व्हिसा फेटाळलाय, तेव्हा मीच…’ शरद पवार यांनी सांगितली आठवण
19
मराठमोळ्या अभिनेत्रीसोबत रिलेशनशीपमध्ये होता 'हीरामंडी'चा अभिनेता, आता ब्रेकअपबाबत केला खुलासा
20
"महिलांच्या कमावण्याच्या नादात वाढतंय घटस्फोटाचं प्रमाण"; सईद अन्वरचं वादग्रस्त विधान! VIDEO व्हायरल

पुसदच्या नवीन वसाहतीत नाल्यांचा अभाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2018 10:34 PM

नगरपरिषद क्षेत्रांतर्गत येणाऱ्या नवीन वसाहतींमध्ये नाल्यांचा अभाव असल्याने ठिकठिकाणी गटार साचले आहे. त्याचा नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे.

ठळक मुद्देडबके साचले : गटारांमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न

ऑनलाईन लोकमतपुसद : नगरपरिषद क्षेत्रांतर्गत येणाऱ्या नवीन वसाहतींमध्ये नाल्यांचा अभाव असल्याने ठिकठिकाणी गटार साचले आहे. त्याचा नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. समतानगर, बंजारा कॉलनीतील संतप्त नागरिकांनी याबाबत नगरपरिषदेला निवेदन दिले आहे.येथील बंजारा कॉलनीतील समता नगर हे नवीन ले-आऊट आहे. येथे सांडपाण्याच्या नाल्यांचा अभाव आहे. येथील नागरिकांनी नाल्यांसाठी वारंवार नगरपरिषदेला निवेदन दिले परंतु उपयोग झाले नाही. उलट यावर कळस म्हणजे नगरपरिषदेने बंजारा कॉलनीतील सांडपाणी वाहून जाण्यासाठी नाली खोदकाम केले. या कॉलनीतील सर्व पाणी समतानगर परिसरात वाहून आले. त्यामुळे या भागात पाण्याचे डबके साचले आहे. त्याचा परिणाम आरोग्यावर होण्याची भीती आहे. तसेच या सांडपाण्यावरून शेजाऱ्यांमध्ये वाद उद्भवत आहे. सांडपाण्याच्या नालीचे काम तात्काळ करावे अन्यथा उपोषणाचा इशारा नागरिकांनी दिला आहे. यानिवेदनावर श्रीकांत भागवत, लक्ष्मण कांबळे, संगीता जाधव, आर.बी. कावळे, काशीराम राठोड, संतोष पवार, प्रदीप पवार, श्रीकांत जोशी, भगवान देशमुख, शंकर नंदनवार, एस. एम. खंडाळे, प्रकाश खंडागळे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.पालिकेवर भारपुसद शहराचा झपाट्याने विकास होत आहे. नवनवीन वसाहती तयार होत आहे. परंतु या वसाहतीत बिल्डर कोणत्या सुविधा देत आहे, याकडे कुणाचेही लक्ष नाही. परिणामी संपूर्ण विकास कामांचा भार पालिकेवर येऊन पडतो. नागरिकही नगरपरिषदेकडेच धाव घेतात.