वणीत युवकावर चाकू हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2020 23:12 IST2020-02-12T23:12:48+5:302020-02-12T23:12:52+5:30

वणी (यवतमाळ) : येथील जुना शिवाजी चौक महादेव मंदीराजवळ एका युवकावर क्षुल्लक कारणावरुन चाकु हल्ला झाल्याची घटना बुधवारी रात्री ९ वाजताच्या ...

Knife attack on youth in stabbing | वणीत युवकावर चाकू हल्ला

वणीत युवकावर चाकू हल्ला

वणी (यवतमाळ) : येथील जुना शिवाजी चौक महादेव मंदीराजवळ एका युवकावर क्षुल्लक कारणावरुन चाकु हल्ला झाल्याची घटना बुधवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास घडली. पोलीसांनी आरोपीला तात्काळ अटक केली आहे.


महेश लक्षमण लोडे(50)रा.शिवाजी चौक वणी असे जखमीचे नाव आहे. महेश शिवाजी चौकात उभा असता राजेश केवलचंद कोठारी,नाना कापसे व आरोपी हार्दीक राजु गुंडे(20)रा.शिवाजी चौक वणी यांच्यात अतिक्रमनातील जागा खाली करण्यावरुन वाद सुरु होता.हा वाद मिटविण्यासाठी महेश लोडे त्या ठिकाणी गेले असता आरोपीने महेशवर धारदार शस्ञाने मानेवर वार केला.या हल्यात महेश लोडे जखमी झाले असुन त्यांचेवर येथिल ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले आहे.त्यानंतर जखमीने पोलीस स्टेशन गाठुन तक्रार दाखल केली.

या तक्रारीवरुन पोलीसांनी कलम 324,504 भादंवी नुसार गुन्हा दाखल केला असुन आरोपीला तात्काळ अटक करण्यात आली असुन पुढील तपास ठाणेदार वैभव जाधव यांचे मार्गदर्शनाखाली सुरु आहे.

Web Title: Knife attack on youth in stabbing