आसामच्या के.एम. अर्भणा पांढरकवडा डीएफओपदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2017 23:49 IST2017-08-21T23:49:14+5:302017-08-21T23:49:40+5:30
येथील उपवनसंरक्षकपदी श्रीमती के.एम. अर्भणा (आयएफएस) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

आसामच्या के.एम. अर्भणा पांढरकवडा डीएफओपदी
लोकमत न्यूज नेटवर्क
पांढरकवडा : येथील उपवनसंरक्षकपदी श्रीमती के.एम. अर्भणा (आयएफएस) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी सोमवारी आपल्या पदाची सूत्रे स्वीकारली. त्या पुसद येथील डीएफओ अरविंद मुंढे यांच्या पत्नी आहेत.
के.एम. अर्भणा या आसाम कॅडरच्या आयएफएस आहेत. पांढरकवडा येथील डीएफओ जी.गुरुप्रसाद यांची आकोटच्या वन्यजीव विभागात बदली झाल्यापासून ही जागा रिक्त होती. येथे के.एम. अर्भणा यांची नियुक्ती करण्यात आली. त्या २०१३ च्या बॅचच्या आयएफएस आहेत. यापूर्वी त्या आसाम राज्यातील गोलाघाट वन विभाग व काझीरंगा राष्टÑीय उद्यान येथे सहायक वनसंरक्षकपदी कार्यरत होत्या.