शहरं
Join us  
Trending Stories
1
Chandra Grahan: कोल्हापूरच्या खगोलप्रेमींनी अनुभवली ब्लड मूनची अद्भुत दृश्यं, एकदा पहाच...
2
टोयोटाकडून मोठी घोषणा! फॉर्च्युनरची ३.४९ लाखांनी किंमत तुटली, क्रिस्टा तर मार्केट खाणार...
3
अख्खी आंदेकर फॅमिली मोस्ट वाँटेड; आयुष कोमकर खून प्रकरणात बंडू आंदेकरसह १३ जणांवर गुन्हे 
4
एकनाथ शिंदेंनी पाडले अजित पवारांच्या राष्ट्रवादीला खिंडार; महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षच फोडला, उद्या प्रवेश
5
Lalbaugcha Raja Visarjan Video: चंद्रग्रहणाला काही मिनिटे शिल्लक असताना...; रात्री ९ वाजता लालबागच्या राजाचे विसर्जन
6
नूतनीकरण ऑक्टोबरमध्ये...! इन्शुरन्स कंपन्या आतापासूनच १८ टक्के जीएसटीवाला हेल्थ प्रिमिअम पाठवू लागल्या
7
'पीएम मोदी देशाचे शत्रू ', ट्रम्प टॅरिफचा उल्लेख करत मल्लिकार्जुन खरगेंचे टीकास्त्र
8
ठाणे : जिल्हा न्यायाधीशांच्या शासकीय घरातील स्लॅब कोसळला; न्यायाधीशांची पीडब्ल्यूडीविरोधात पोलिसांत तक्रार
9
गुंडगिरीचा कळस! माजी सरपंचावर जीवघेणा हल्ला; लाेखंडी राॅड, स्टंपने २२ मिनिटे मारहाण
10
इस्रायलने अचानक एअरस्पेस बंद केली; नेमके काय घडतेय... गाझा पट्टी की आणखी काही...
11
लव्ह स्टोरीचे बिंग फुटण्याची भीती; पोलिस भरती अकॅडमीच्या संचालकांनेच केले विद्यार्थ्याचे अपहरण
12
लहान मुलांना सनरुफ उघडून देताय? महिंद्रा ३XO चा व्हिडीओ पहाल कर, थरकाप उडेल...
13
ऐन पौर्णिमेलाच चंद्र झाकोळला; चंद्रग्रहणाला सुरुवात, रात्री ११ वाजता लाल रंगात दिसणार...
14
ओबीसी आणि मराठा आरक्षणावर राज्य सरकार ठाम; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची स्पष्टोक्ती
15
“मनोज जरांगे पाटील मराठा समाजाचे नुकसान करतायत, स्वतःचे महत्त्व वाढावे...”; कुणी केली टीका?
16
धुळे हळहळले! रील स्टार शुभम सिंघवी याच्या दुचाकीला अपघात, जागेवरच मृत्यू
17
अवघ्या १५०० रुपयांत बनावट आधारकार्ड, दोन हजार लोकांना 'त्यानं' बनवलं मूर्ख! पोलिसांनी कसं पकडलं?
18
नऊवारी, फेटे अन् ढोल ताशे! जर्मनीच्या ड्युसलडॉर्फमध्ये उत्साहात साजरा झाला गणेशोत्सव!
19
भंडाऱ्याची उधळण अन पुष्पवृष्टी, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीला दिमाखदार मिरवणुकीने निरोप!
20
दहशतवाद्यांना पाकिस्तानची साथ; भारताने पाडलेल्या लष्कर-ए-तैयबाच्या मुख्यालयाचे बांधकाम पुन्हा सुरू

व्यावसायिकाच्या मुलाचे अपहरण खंडणीसाठी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2019 22:22 IST

येथील सायकल व्यावसायिकाच्या मुलाचे अपहरण करून ५० लाखांची खंडणी मागण्यात आली होती. या गुन्ह्याचा अवधूतवाडी पोलिसांनी दहा तासात छडा लावला. प्रमुख आरोपी हा भाजपा आयटी सेलचा पदाधिकारी असून त्याचे कापड दुकान आहे.

ठळक मुद्देभाजप आयटी सेलचा पदाधिकारी सूत्रधार : सहा जणांना पीसीआर

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : येथील सायकल व्यावसायिकाच्या मुलाचे अपहरण करून ५० लाखांची खंडणी मागण्यात आली होती. या गुन्ह्याचा अवधूतवाडी पोलिसांनी दहा तासात छडा लावला. प्रमुख आरोपी हा भाजपा आयटी सेलचा पदाधिकारी असून त्याचे कापड दुकान आहे. या गुन्ह्यात पोलिसांनी सहा आरोपींना सोमवारी रात्री अटक करून अपहरण झालेल्या मुलाची सुखरूप सुटका केली. न्यायालयाने सहाही आरोपींना रविवार २१ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.सायकल विक्रेता ईश्वर चोलाराम नचवाणी रा.सिंधी कॅम्प, वैद्यनगर यांनी मुलाचे अपहरण झाल्याची तक्रार अवधूतवाडी पोलीस ठाण्यात दिली. सोमवारी सकाळी ११ वाजताची घटना होती. शिवाजी गार्डन चौक परिसरातून दुचाकीवर हर्ष ईश्वर नचवाणी (१७) याचे अपहरण झाले होते. या अपहरणाच्या कटाचा मास्टर मार्इंड शुभम शंकरलाल तोलवाणी (२५) रा.कवरनगर, सिंधी कॅम्प व किसन नारायणदास कोटवाणी (२५) रा.कवरनगर सिंधी कॅम्प हे दोघे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यातील किसन कोटवाणी हा पसार होण्यात यशस्वी झाला. तर शुभम तोलवाणी हा पोलिसांसोबतच जंगल परिसरात फिरत होता. या गुन्ह्यात त्यांनी कुख्यात नीलेश वलजीभाई उन्नरकाठ (३७) रा.चांदणी चौक याची मदत घेतली. अपहरणाची सुपारी मिळाल्यानंतर नीलेशने सतीश देवीदास शेलोटकर (३७) रा.गोदामफैल, नीतेश बाबूसिंग राठोड (३१) रा.बोरगाव दाभडी ता.आर्णी, अरविंद लक्ष्मण साबळे (२६) रा.पिंपळगाव यांची मदत घेतली. हर्षचे रविवारीच अपहरण करण्याचा कट होता. मात्र ते शक्य झाले नाही. सोमवारी सकाळी तो शिंदे प्लॉटमधील कोचिंग क्लासेसमधून बाहेर पडल्यानंतर त्याला शिवाजी गार्डन चौकातून उचलण्यात आले. हे काम अरविंद साबळे व सतीश शेलोटकर याने केले. या कामात सतीशची पल्सर दुचाकी वापरण्यात आली. त्यानंतर नीलेश उन्नरकाठच्या सांगण्यावरून हर्षला घेऊन हे आरोपी दारव्हा मार्गावरील इचोरी येथील जंगल परिसरात पोहोचले. त्यानंतर नीलेश राठोड व नीलेश उन्नरकाठ हे चारचाकी वाहनाने तेथे पोहोचले. तिथेच हर्षच्या मोबाईलमध्ये त्याचा व्हिडीओ चित्रीत करून ईश्वर नचवाणी यांच्याकडे पाठविण्यात आला. पोलीस येत असल्याची कुणकुण लागताच मास्टर मार्इंड शुभम तोलवाणीने याची माहिती उन्नरकाठला दिली. त्याचवेळी तो किसन कोटवाणीच्याही संपर्कात होता. पोलीस पथक जंगलात पोहोचताच आरोपींनी हर्षला घेऊन इचोरीवरून बोथबोडण व तेथून अर्जुना मार्गे यवतमाळात प्रवेश केला. पोलिसांच्या हालचाली वाढल्या. हे पाहून अपहरणकर्तेही घाबरले. त्यांनी सूरज ऊर्फ सपना विश्वनाथ शुक्ला (३८) रा.बाजोरियानगर याच्या मदतीने बाजोरियानगरातील एका बंद घरातील खोलीत ठेवण्यात आले. दरम्यान शुभम पोलिसांसोबत डबल गेम करतोय हे लक्षात येताच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. मात्र याची कुणकुण लागल्याने त्याचा साथीदार किसन कोटवाणी पळून जाण्यात यशस्वी झाला.आरोपीच्या मागावर असलेल्या अवधूतवाडी ठाण्यातील शोधपथकाने बाजोरियानगरातील बंद घराचा शोध लावला. तेथे दार तोडून घरात प्रवेश केला. यावेळी वॉचमन सूरज शुक्ला व नीलेश उन्नरकाठ यांनाही सोबत घेतले होते. पोलिसांनी दार तोडूनच हर्षची सुटका केली. तेथून तिघांना ताब्यात घेतले. घटनेचा उलगडा झाल्यानंतर आरोपींकडून गुन्ह्याची कबुली घेतली. रात्री ११ वाजेपर्यंत आरोपी व अपहरण झालेला मुलगा पोलिसांच्या ताब्यात होता. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार आनंद वागदकर, फौजदार संदीप मुपडे, सहायक फौजदार परशराम अंभोरे, जमादार सुरेश मेश्राम, रितूराज मेडवे, सलमान शेख, सुधीर पुसदकर, गणेश राठोड यांनी केली.ओळख लपविण्यासाठी आरोपीने केले टक्कलअपहरणाच्या कटात प्रत्यक्ष हर्षला उचलण्यासाठी गेलेल्या अरविंद लक्ष्मण साबळे या आरोपीने नंतर स्वत:ची दाढी काढून टाकली. सोबतच टक्कल केले. त्यावेळी त्याला हर्षने बघितले होते. नंतर वर्णनावरून पोलीस पकडतील याची भीती वाटल्याने त्याला साथीदार नीलेश उन्नरकाठ याने खबरदारीसाठी टक्कल करण्यास सांगितले.क्रिकेट सट्ट्यात कर्जबाजारी झालेल्यांनी रचला कटक्रिकेट सट्ट्यात कर्जबाजारी झालेल्या कापड व्यावसायिकांच्या मुलांनी आपल्या शेजारी असलेल्या व्यावसायिकाच्याच मुलाच्या अपहरणाचा कट रचला. यात शुभम तोलवाणी हा भाजपा आयटी सेलचा पदाधिकारी असून त्याचे इंदिरा गांधी मार्केटमध्ये कापड दुकान आहे. तर किसन कोटवाणी याचे नेताजी मार्केटमध्ये कापड दुकान आहे. क्रिकेट सट्टा व इतर प्रकारचे झालेले कर्ज परतफेड करण्यासाठी हा अपहरणाचा कट रचल्याचे सांगितले जाते.ते म्हणाले, आम्ही भाईची माणसं आहोतशिवाजी गार्डनच्या वर्दळीच्या परिसरातून हर्षचे अपहरण करण्यात आले. त्याला चालत्या दुचाकीवरून पाडून स्वत:च्या दुचाकीवर बसवून धमकावत गावाच्या बाहेर नेण्यात आले. त्यावेळी अपहरणकर्त्या दोघांनी आम्ही भाईची माणसं आहोत तू आवाज करू नको अथवा खत्म करू, अशी धमकी दिल्याने हर्ष घाबरला व चुपचाप दुचाकीवर बसून गेला. ही घटना सकाळी ११ वाजता घडली. पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांनी एकूण १६ पथके स्थापन केली. त्यांनी दहा तासातच गुन्हेगारांचा शोध लावला.