शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
2
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
3
आधार कार्ड काढायला घराबाहेर पडले ते परतलेच नाहीत; पेट्रोल पंप मालकाचा २ मुलींसह संशयास्पद मृत्यू
4
Hero: ड्युअल डिस्क ब्रेक्स, मल्टीपल राइडिंग मोड्स आणि बरेच काही; हिरो एक्सट्रीम १२५ आर लॉन्च!
5
अरे देवा! मेट्रो स्टेशन तयार झालं पण नंतर कळालं उंचीच कमी, पुढं जे केलं ते पाहून थक्क व्हाल
6
स्टाँग रूमचे CCTV बंद, मध्यरात्री एका पिकअप व्हॅनची एन्ट्री; RJD च्या आरोपानंतर तपासाचे आदेश
7
चीनने वाढवली लष्करी ताकद! तिसरी विमानवाहू युद्धनौका 'फुजियान' तयार, अमेरिकेची चिंता वाढली
8
आधी ४५ कोटींचे मेट्रो स्टेशन बनवले, नंतर लक्षात आलं की उंची कमी झाली; मग...; हा जुगाड जाणून डोक्यावर हात माराल
9
कोण आहेत गजाला हाशमी? ज्यांनी अमेरिकेत रचला नवा इतिहास; भारताशी थेट कनेक्शन, जाणून घ्या
10
वीज चमकली की सुरू होतं काउंटडाउन!… काय आहे क्रिकेटच्या मैदानात क्वचित लागू होणारा '30:30 नियम'?
11
चॉकलेट की बिस्किट... आरोग्यासाठी जास्त धोकादायक काय? खाण्याआधी एकदा विचार कराच
12
बिहारमध्ये वाढलेल्या मतदानाचा अर्थ काय, कोणता फॅक्टरमुळे वाढलं मतदान? प्रशांत किशोरांनी मांडलं गणित
13
ब्रिस्बेनच्या मैदानात पावसाची बॅटिंग! टीम इंडियानं ऑस्ट्रेलियाविरुद्धची टी-२० मालिका २-१ अशी जिंकली
14
'...तर आम्ही शिंदेंच्या शिवसेनेसोबतची दोन जिल्ह्यात युती तोडू'; नारायण राणेंचा इशारा, तेलींबद्दल काय बोलले?
15
डॉक्टरच्या लॉकरमध्ये मिळाली AK-47 रायफल, जम्मू-काश्मीर पोलीसही चकित; नेमकं प्रकरण काय?
16
"भैया मत करो...", बाईकवर मागे बसलेल्या तरुणीसोबत रॅपिडो चालकाचं धक्कादायक कृत्य
17
Mumbai: कूपर रुग्णालयात मृत रुग्णाच्या नातेवाईकाकडून डॉक्टरांना मारहाण
18
"आधी कर्जबाजारी व्हायचं आणि मग पुन्हा कर्जमाफी मागायची"; राधाकृष्ण विखे पाटलांची शेतकऱ्यांवर आगपाखड
19
"पंतप्रधान मोदींनीही घातली होती टोपी, मी फोटो पाठवेन", मुस्लीम तुष्टीकरणाच्या आरोपांवर काय म्हणाले रेवंत रेड्डी?
20
Rishabh Pant: टीम इंडियाचं टेन्शन वाढलं, ऋषभ पंत पुन्हा जखमी, अर्ध्यातच मैदान सोडलं!

मारेगावात रिव्हाॅल्वरच्या धाकावर डाॅक्टरचे अपहरण, तीन लाख रूपये घेऊन लुटारू फरार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2023 10:59 IST

मारेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

संतोष कुंडकर

वणी (यवतमाळ) : रुग्णालयातील काम आटोपून स्कुटीने मारेगावकडे येणाऱ्या एका डाॅक्टरला रिव्हाॅल्वरच्या धाकावर अडविले. त्यानंतर त्याला कारमध्ये बसवून वणीत आणण्यात आले. येथे डाॅक्टरने मित्राकडून तीन लाख रुपये घेऊन ते अपहरणकर्त्यांना दिले. त्यानंतर अपहरणकर्त्यांनी डाॅक्टरला मारेगाव मार्गाने परत नेऊन वाटेत सोडून दिले. ही थरारक घटना सोमवारी (दि.१३) सायंकाळी ७.३० वाजताच्या सुमारास घडली. याप्रकरणी मारेगाव पोलीस ठाण्यात चार अज्ञात लुटारूंविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

डाॅ. प्रोवेश हाजरा (४८) असे अपहरण झालेल्या डाॅक्टरचे नाव आहे. मारेगाव तालुक्यातील नवरगाव येथे त्यांचे क्लिनिक आहे. नेहमीप्रमाणे सोमवारी सायंकाळी ओपीडी आटोपून स्कुटीद्वारे ते मारेगावकडे येत असताना ७.३० वाजताच्या सुमारास मारेगाव-यवतमाळ मार्गावरील करणवाडीजवळ असलेल्या पेट्रोलपंपालगत मागून आलेल्यास्विफ्ट कारने त्यांना अडविले. त्यातून उतरलेल्या एकाने डाॅ.हाजरा यांच्या डोक्याला रिव्हाॅल्वर लावून कारमध्ये बसण्यास सांगितले.

डाॅक्टर हाजरा यांना कारमध्ये बसविल्यानंतर अपहरणकर्त्यांची कार मारेगावकडे निघाली. कारमधील चारजणांपैकी एकाने डाॅक्टरची स्कुटी घेतली. नंतर मारेगावजवळ रस्त्याच्या कडेला स्कुटी सोडून देण्यात आली. या अपहरणकर्त्यांनी डाॅक्टरला जीवे मारण्याची धमकी देत पाच लाखांची मागणी केली. त्यावर डाॅक्टरने माझ्याकडे एवढी रक्कम नाही. मात्र वणी येथील मित्राकडून तीन लाख रूपये घेऊन तुम्हाला देतो, असे अपहरणकर्त्यांना सांगितले. त्यानंतर डाॅक्टरला घेऊन ही कार वणीतील शेवाळकर परिसरात पोहोचली. डाॅ.हाजरा यांनी मोबाईलवरून मित्राशी संपर्क साधून तीन लाख रूपये मागितले. मित्राने ही रक्कम तातडीने शेवाळकर परिसरात पोहोचविली.

पैसे मिळताच अपहरणकर्ते डाॅक्टरला घेऊन पुन्हा मारेगावकडे निघाले. वाटेत डाॅक्टरच्या गळ्यातील सोन्याची साखळी, हातातील अंगठीही काढून घेतली. त्यानंतर वणी-मारेगाव दरम्यान असलेल्या निंबाळा गावाजवळ डाॅक्टरला सोडून देऊन अपहरणकर्ते मारेगावच्या दिशेने निघून गेले. दरम्यान, डाॅ.हाजरा यांनी घडलेल्या घटनेची तक्रार मारेगाव पोलीस ठाण्यात दाखल केली. तक्रारीवरून पोलिसांनी अपहरणकर्त्यांविरूद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला. पोलिसांकडून अपहरणकर्त्यांचा शोध सुरू आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीYavatmalयवतमाळKidnappingअपहरण