खैरी येथे पत्नीचा गळा आवळून खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2017 23:27 IST2017-10-27T23:27:13+5:302017-10-27T23:27:24+5:30

क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादात पत्नीचा गळा आवळून खून केल्याची घटना राळेगाव तालुक्यातील खैरी येथे शुक्रवारी सकाळी ६ वाजताच्या सुमारास घडली.

Khairi wife's neck covered in the neck | खैरी येथे पत्नीचा गळा आवळून खून

खैरी येथे पत्नीचा गळा आवळून खून

ठळक मुद्देक्षुल्लक वाद : पतीचे ठाण्यात आत्मसमर्पण

लोकमत न्यूज नेटवर्क
वडकी : क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादात पत्नीचा गळा आवळून खून केल्याची घटना राळेगाव तालुक्यातील खैरी येथे शुक्रवारी सकाळी ६ वाजताच्या सुमारास घडली. खून केल्यानंतर पतीने थेट वडकी पोलीस ठाणे गाठून आत्मसमर्पण केले.
ज्योती विनोद धोटे (३०) असे मृत महिलेचे नाव आहे. तर विनोद महादेव धोटे (३५) असे आरोपी पतीचे नाव आहे. विनोद आणि ज्योती खैरी येथे दोन मुलींसह राहात होते. अशातच विनोदचा पत्नीसोबत किरकोळ कारणाहून वाद झाला.
या वादात विनोदने शुक्रवारी सकाळी ६ वाजता पत्नी ज्योतीचा गळा आवळला. त्यातच तिचा मृत्यू झाला. पत्नीचा खून केल्यानंतर विनोद थेट वडकी पोलीस ठाण्यात पोहोचला. गावात घटनेची माहिती होताच गावकºयांनी घटनास्थळाकडे धाव घेतली.
या प्रकरणी ज्योतीचे वडील पुंजाराम चंद्रभान जोगी रा.कुंभा यांनी तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी विनोदविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला. अधिक तपास पांढरकवडाचे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल कोळी, वडकीचे ठाणेदार दीपक पवार यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक दीपक काँक्रेडवार, शिपाई सूरज चिव्हाणे, रूपेश जाधव, प्रदीप भानारकर करीत आहे.

Web Title: Khairi wife's neck covered in the neck